शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रीगोंदा तालुका.. व हिंदुहृदय सम्राट प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव उत्साहात संपन्न..

दिनांक १८ मार्च २०२५,श्रीगोंदा:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रीगोंदा तालुका, हिंदुहृदय सम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक किरण शिंदे, माजी आमदार बबनराव पाचपुते, नगरसेवक योगीराज गाडे, शुभांगी ताई पोटे, बापू तात्या गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब दुतारे, सुरेश देशमुख, संभाजी घोडके, दीपक घोडके, शिवाजी समदडे, सागर खेडकर, राहुल गायकवाड, रघुनाथ सूर्यवंशी, संतोष चिकलठाणे, हरिभाऊ काळे, गणेश लाटे, सोमनाथ धोत्रे, सुदाम सावंत, सुशांत भंडारी, देविदास तोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संध्याकाळी ८:०० मिरवणूक काढण्याचा खर्च टाळून उपस्थितांना प्रेरणादायी ‘छावा’ चित्रपट दाखविण्यात आला. संध्याकाळी शिवप्रतिमेचे पूजन करून चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रतिभाताई पाचपुते, मंजुळाताई देशमुख, अनुराधाताई दुतारे, ज्योतीताई खेडकर, सुनिताताई शिंदे, मनीषाताई घोडके, सागर खेडकर, राहुल गायकवाड, कुलदीप क्षिरसागर, सुशांत काळे, पत्रकार चंदन घोडके, अमर घोडके, विशाल चव्हाण, अमीन भाई शेख तसेच सुदाम झुंजुरुक शिवसैनिक आणि शिवभक्त उपस्थित होते.

शिवसैनिक, युवा सैनिक, शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, हिंदुहृदयसम्राट प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. छावा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. संपूर्ण उत्सव शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading