#श्रीगोंदा: शेजाऱ्यांचा जातीय द्वेष – महिलेला दिल्या जातीवाचक शिव्या, घर सोडण्याची धमकी..

श्रीगोंदा (ता. १९ जुलै २०२५):

शहरातील बेडकरमळा भागातून एक गंभीर जातीय तेढ व शेजारी त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिलेला केवळ तिच्या जातीमुळे सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार महिला सकाळी घरासमोरील नळावर पाणी भरत असताना, शेजारी राहणाऱ्या सौ.वाघस्कर हिनी तिला उद्देशून जातीवाचक अपशब्द वापरत, “तुम्ही घाणारडे महार जातीचे लोक आहात. तुमची आमच्या शेजारी राहायची लायकी नाही,” असे म्हटले. इतकेच नव्हे तर, “तु कामाला जात नाहीस, धंदा करतेस,” अशा स्वरूपाच्या अत्यंत हीन व अपमानास्पद टीका केली.

महिलेने ही बाब सौ.वाघस्कर हिच्या पतीकडे सांगितली असता, त्यांनी “माझी बायको काय करते त्याच्याशी मला संबंध नाही, तुम्हाला हवं ते करा,” असे म्हणत दुर्लक्ष केले.

यानंतरही सौ.वाघस्कर हिनी त्रास देणे थांबवले नाही. त्यांनी तक्रारदार महिलेसह तिचे सासरचे सदस्य – दिर सचिन, सासू मोनिका आणि लहान मुलांनाही शिवीगाळ करत, “हे घर सोडा, नाहीतर मी औषध पिऊन आत्महत्या करेन आणि तुमचं नाव चिठ्ठीत लिहून ठेवीन,” अशी धमकी दिली.

या प्रकाराला यापूर्वीही अनेक वेळा तोंड द्यावे लागले असून, सौ.वाघस्कर वारंवार तक्रारदाराच्या घरासमोर कचरा व घाण टाकते, पाणी फेकते, पाहुणे आले तरीही शिवीगाळ करते. विशेष म्हणजे, घरातील इतर सदस्य काही बोलले, तर “तुमच्या दिरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन” अशी धमकी दिली जाते.

या सर्व प्रकारांमुळे तक्रारदार व तिच्या कुटुंबास गंभीर मानसिक त्रास व जिवीतास धोका निर्माण झाला असल्याने, त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सौ.वाघस्कर हिच्या विरोधात जातीय अत्याचार, धमकी व विनयभंगासारख्या गंभीर प्रकरणांची लेखी तक्रार दाखल झाली आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading