दिनांक २० जून २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विशिष्ट समाजाच्या सदस्यांचा उच्छाद वाढत असून ॲट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवून सामान्य नागरिकांना लुटण्याचे प्रकार समोर आले आहेत.
गेल्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील एका गावात घडलेल्या घटनेत, मित्राच्या वाढदिवसाच्या समारंभात डीजे समोर नाचताना झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. यामध्ये लोखंडी रॉडने डोक्यावर मारल्याने एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याला सहा ते सात टाके पडले.
दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर, चळवळीतील पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु, पीडित आणि त्याचे सहकारी यांनी प्रकरण मिटवण्यासाठी १ लाख ७० हजार रुपये मागणी केली. शेवटी, पैसे देऊन प्रकरण मिटवण्यात आले.
ही घटना ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केल्याचा स्पष्ट पुरावा ठरली आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करता, पीडितांनी पैशांच्या मागणीसाठी कायद्याचा गैरवापर केला.
अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वीही शनी चौक परिसरात आदिवासी समाजाच्या महिलांनी युवकांना धमकावत पैसे वसूल केल्याचे प्रकार घडले होते.
या विशिष्ट समुदायाच्या सदस्यांनी वर्दळीच्या रस्त्यावर अपघात घडवून पैसे वसूल करण्याचे प्रकार सर्रास केले आहेत. पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय परिसरात त्यांच्या वर्तनामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
स्रोत: (अधिकृत माहिती नुसार.)



