कोळगाव ग्रामपंचायतीस ई-स्कूटर भेट – उद्योजक दत्तात्रय मेहेत्रे यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सत्कार..


दिनांक २० जून २०२४, कोळगाव, श्रीगोंदा:

कोळगावचे सुपुत्र व पुणे येथील उद्योजक दत्तात्रय रामभाऊ मेहेत्रे यांनी श्री कोळाईदेवी यात्रेनिमित्त कोळगाव ग्रामपंचायतीस इलेक्ट्रिक टू व्हीलर स्कूटर भेट दिली आहे. त्याबद्दल कोळगाव ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच माया मेहेत्रे होत्या.

यावेळी ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी निमित्त शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दत्तात्रय रामभाऊ मेहेत्रे हे ग्रीन शटल टेक्नॉलॉजी, चाकण, पुणे या कंपनीचे संचालक असून, त्यांच्या कंपनीत इलेक्ट्रिक दुचाकी व चार चाकी वाहनांचे उत्पादन केले जाते. त्यांनी आपल्या वडील कै. रामभाऊ गेनू मेहेत्रे यांच्या स्मरणार्थ श्री कोळाईदेवी यात्रेनिमित्त कोळगाव ग्रामपंचायतीस इ स्कूटर भेट दिली.

या कार्यक्रमास कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच माया मेहेत्रे, ग्रामपंचायत सदस्य विलास शितोळे, महेंद्र रणसिंग, निखिल लगड, प्रदीप आढाव, संजय जगताप, दत्तात्रय मेहेत्रे यांच्या पत्नी गीतांजली मेहेत्रे, मुलगा डॉक्टर ब्रिजेश मेहत्रे, बंधू संजय मेहेत्रे, राजेंद्र मेहेत्रे, माजी उपसरपंच मधुकर लगड, नितीन नलगे, कुकडीचे माजी व्हाईस चेअरमन विश्वास थोरात, धोंडीबा लगड, संजय मेहेत्रे, संतोष मेहेत्रे, संदीप दिवेकर, किरण नलगे, प्रवीण करपे, अशोक जगताप आणि इतर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना आरती रूपाने मानवंदना देण्यात आली.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे.)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading