“साजन शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन साजन पाचपुते विरुद्ध साखर करार फसवणुकीच्या आरोपाखाली कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल”

दिनांक २६ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा/छत्रपती संभाजीनगर, कन्नड:

प्रिमीयम ऍग्रो इनपुट्स अँड टेन्ट सर्व्हिसचे मालक दीपक फकीरचंद पांडे यांनी साजन शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन श्री. साजन सदाशिवराव पाचपुते आणि त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध गंभीर आरोप करीत कन्नड पोलिस ठाण्यात दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत पांडे यांनी दावा केला आहे की, त्यांनी ६२ लाख रुपयांची आगाऊ रक्कम भरून साखरेची खरेदी केली होती, परंतु त्यांना साखर न देता पाचपुते आणि संचालक मंडळाने त्यांची फसवणूक केली आहे.

फिर्यादीनुसार, २०२२ साली पांडे यांनी पाचपुते यांच्या कंपनीसोबत साखर खरेदी करण्यासाठी करारनामा केला होता. कराराच्या अटींनुसार, त्यांनी ६२ लाख रुपये HDFC बँक शाखा बिबवेवाडी, पुणे येथील खात्यावर RTGS द्वारे जमा केले होते. परंतु ठरलेल्या कालावधीत साखर न मिळाल्यामुळे पांडे यांनी पाचपुते यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला, मात्र त्यांना फक्त आश्वासनंच मिळाली. शेवटी, पांडे यांना दिलेले चेक वटले नसल्यामुळे त्यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास सुरू केला आहे आणि पाचपुते व संचालक मंडळाविरुद्ध भारतीय न्यायसंहितेचे कलम ३(५), ३१६(२), ३१६(५), व ३१८(४) नुसार कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

स्रोत:(फिर्याद)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading