दिनांक २७ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:
सिद्धार्थनगर जिल्हा परिषद शाळेतील विविध शालेय समित्यांच्या निवडी शाळेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या निवड प्रक्रिया सुमारे शंभर महिला व पुरुष पालकवर्गाच्या उपस्थितीत पार पडली. उपस्थितांनी यावेळी उत्साहाने सहभाग नोंदवला.
सभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी घोडके होते. यावेळी बोलताना जीवाजी घोडके, हृदय घोडके, अनिल ससाणे, आनंद घोडके, गोरख घोडके, सुनील घोडके आणि भारत घोडके यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळेत तातडीने सीसीटीव्ही बसवण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच शाळेजवळून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक असल्याने तिथे गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली.
शाळेच्या गुणवत्तेत व पटसंख्येत वाढ होत असल्याबद्दल मुख्याध्यापक संदीप मोटे आणि सर्व शिक्षकवर्गाचे अभिनंदन करत कौतुक करण्यात आले. शाळेतील पटसंख्या सुमारे दोनशे पर्यंत पोहोचली आहे.
यावेळी निवडलेल्या विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
१. शाळा सल्लागार समिती:
– अध्यक्ष: डॉ. संतोष नारायण घोडके
– उपाध्यक्ष: नंदू श्रावण ससाणे
२. शालेय बांधकाम समिती:
– अध्यक्ष: संदीप दिलीप उमाप
– उपाध्यक्ष: आनंद धोंडीबा घोडके
३. माता पालक समिती:
– अध्यक्ष: रेखा लक्ष्मीकांत घोडके
– उपाध्यक्ष: अरुणा अर्जुन ससाणे
४. शिक्षक पालक समिती:
– अध्यक्ष: गोरख जालिंदर घोडके
– उपाध्यक्ष: किशोर मारुती नेटके
५. शालेय पोषण आहार समिती:
– अध्यक्ष: नीलम आनंद घोडके
– उपाध्यक्ष: रूपाली नितीन वायदंडे
६. शाळा परिवहन समिती:
– अध्यक्ष: संदीप युवराज मोटे (मुख्याध्यापक)
– उपाध्यक्ष: सुरज भानुदास घोडके आणि नितीन पांडुरंग ससाणे
७. महिला तक्रार निवारण (विशाखा) समिती:
– अध्यक्ष: शेळके शारदा प्रकाश (शिक्षिका)
– उपाध्यक्ष: पूजा संदीप ससाणे
८. शाळा व्यवस्थापन समिती:
– अध्यक्ष: भाऊसाहेब अंकुश घोडके
– उपाध्यक्ष: पप्पू दिलीप घोडके
निवड झालेल्या सदस्यांसह, चंपालाल घोडके, जितेंद्र पाटोळे, गणेश घोडके, भिका ससाणे, अक्षय ससाणे, श्याम घोडके, ऋषी कांबळे, वर्षा शेलार, राणी घोडके, दत्तात्रय घोडके, आशा गायकवाड, गंगावती भिंगारदिवे, अरुणा ससाणे, रेखा घोडके, सुमनताई ससाणे, शिक्षक संतोष सोनवणे, वर्षा घालमे, ज्योती खंडागळे, मंगल मोटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालकवर्ग उपस्थित होता.
सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप मोटे यांनी केले. तर, सूत्रसंचालन शारदा शेळके यांनी केले. आभार प्रदर्शन संतोष खंडागळे यांनी केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





