दिनांक २७ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
परिक्रमा कॉलेज, काष्टी येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय १९ वर्षे मुले क्रिकेट स्पर्धेत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाने अप्रतिम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयानंतर आता या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे.
स्पर्धेत सेमी फायनलमध्ये महाराजा कॉलेजने परिक्रमा सायन्स कॉलेजचा पराभव केला, तर फायनलमध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयाला हरवत अंतिम विजय मिळविला. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आदित्य औटी, सुजित शिंदे, विशाल वायकर, प्रणव घोडके, कुणाल पवार, प्रेम जाधव, आणि कृष्णा वायकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. संघाच्या यशामध्ये क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव आणि क्रिडा संचालिका कल्पना बागुल यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
विजयी संघाच्या खेळाडूंना महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, सदस्य बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार राहुल जगताप, महावीर पाठवा, महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव जरे साहेब, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, जुनियर उपप्राचार्य शहाजी मखरे, पर्यवेक्षक झिटे सर, जिमखाना प्रमुख संजय अहीवले, विभाग प्रमुख, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. विजयी संघाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
संघाची जिल्हास्तरीय स्पर्धा १७ ते १८ सप्टेंबर रोजी कोपरगाव येथील आत्मा मलिक स्कूल कोकमठाम येथे होणार आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





