श्रीगोंदा ते चौंडी प्रेरणा सायकल वारी; प्रा. राम शिंदे यांना जीवनगौरव सन्मान..

दिनांक २६ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा येथील अग्नीपंख फाउंडेशनच्या पुढाकाराने ६५ किमीची प्रेरणा सायकल वारी काढण्यात आली. या वारीदरम्यान सायकलपटूंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारकास मानवंदना दिली. चौंडी (ता. जामखेड) येथे झालेल्या समारंभात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला माजी मंत्री बबनराव पाचपुते, वीरपत्नी रंजना काळे, मोहीनी म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. राम शिंदे म्हणाले, “सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उच्च पदापर्यंत पोहोचणे सोपे नसते. पण जनतेच्या आशीर्वादाने हे शक्य झाले.”

अग्नीपंख फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा करत बबनराव पाचपुते यांनी प्रा. राम शिंदे यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक केले. यावेळी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात विठ्ठलराव वाडगे, राजेंद्र म्हस्के, गणेश काळदाते, बाळासाहेब गांधी, पत्रकार विशाल चव्हाण, गोपाळराव डांगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading