दिनांक १३ सप्टेंबर २०२५,माळेगाव/श्रीगोंदा –
राज्य उत्पादन शुल्क विभाग, बारामतीने माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी दारू वाहतुकीवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत २,२९५ लिटर गावठी दारू, तीन दुचाकी, तीन चारचाकी वाहने व एक टेम्पो असा तब्बल १४.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी सुग्रीव व सिताराम भंडलकर (रा. खांडज), नवनाथ गव्हाणे (रा. माळेगाव खुर्द), काशिनाथ चव्हाण (रा. वरळेगाव, सोलापूर), सागर गव्हाणे, दत्तात्रय गिरे (रा. दाणेवाडी, श्रीगोंदा), आकाश पवार (रा. वडजी तांडा, सोलापूर) यांच्यासह एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अधीक्षक अतुल कानडे, उपअधीक्षक उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शहाजी शिर्के, दुय्यम निरीक्षक गिरीषकुमार कर्चे व त्यांच्या पथकाने केली.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise..
