श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसकडून तहसीलदार कार्यालयात निवेदन; आठ दिवसांत मागण्या न झाल्यास टाळे ठोका आंदोलनाचा इशारा..

दिनांक २३ फेब्रुवारी २०२६,श्रीगोंदा:

तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार श्रीगोंदा कार्यालयात पुरवठा विभागातील अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी अप्पर तहसीलदार प्रवीण मुदगल व पुरवठा निरीक्षक गोरे उपस्थित होते.

युवक काँग्रेसने भुमिअभिलेख कार्यालय श्रीगोंदा येथे उपनिरीक्षक भूमी अभिलेख पदावर कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी केली. तसेच, पुरवठा विभागातील प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास भूमिअभिलेख कार्यालयास टाळे ठोका आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस अस्लम भाई शेख, पेडगावचे माजी सरपंच भगवान आप्पा कणसे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास काळे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजफ्फर भाई शेख, सचिन भाऊ गायकवाड, डॉ. गोरख बायकर, वडाळीगावचे सरपंच महेश दरेकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष भोईटे, अमोल भोसले, संदीप वागस्कर, सोहेल शेख, प्रवीण ढगे, दादा काटकर आणि भाऊ गावढे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्रोत:(निवेदन)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading