राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव: तांदळीचे माजी उपसरपंच राजेंद्र भोस यांना मानाचा सन्मान..

दिनांक २३ फेब्रुवारी २०२५,अहिल्यानगर:

छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगे महाराज जयंती निमित्त स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराने तांदळीचे माजी उपसरपंच राजेंद्र भोस यांना गौरविण्यात आले.

बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी अहिल्यानगर येथील परिवार मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेशजी लंके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजेंद्र भोस यांनी सामाजिक व ग्रामविकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

कार्यक्रमावेळी तांदळी गावचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे, लहुजी सेना जिल्हाध्यक्ष संतोषजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पती नर्सिंग भोस, माजी सदस्य लक्ष्मण भोस यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकृत करताना राजेंद्र भोस यांनी गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करण्याची ग्वाही दिली. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading