छावा ट्रेकिंग ग्रुपचा रायरेश्वर गडावर अवयवदानाचा संकल्प..

दिनांक २३ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

छावा ट्रेकींग ग्रुपने रायरेश्वर गडावर शिवजयंती उत्सव साजरा करत अवयवदानाचा संकल्प करून अनोखी सामाजिक जबाबदारी पार पाडली. हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या या ऐतिहासिक गडावर छावा ग्रुपचे ६५ मावळे अवयवदानासाठी पुढे सरसावले.

कार्यक्रमासाठी भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकरराव रहाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. तसेच अग्नीपंख फौंडेशनने बांधलेल्या शाळेला भेट देण्यात आली आणि रायरेश्वर मंदिरात शिवरायांचे दर्शन घेण्यात आले.

मधुकर रहाणे यांनी छावा ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक करत म्हणाले, “अवयवदानाचा संकल्प हा खऱ्या अर्थाने जीवनदान देणारा आहे. रायरेश्वरसारख्या ऐतिहासिक गडांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.”

छावा ट्रेकींग ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ खामकर यांनी सांगितले की, “ग्रुप ना नफा ना तोटा तत्त्वावर गडांचे दर्शन आणि शिवचरित्र प्रचाराचे कार्य करतो.”

कार्यक्रमात शहाजी खेतमाळीस, प्रा. शंकर गवते, संतोष सांगळे, नवनाथ दरेकर, रेश्मा डांगे आणि प्रकाश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ताजी जगताप यांनी केले.

शिवजयंतीच्या निमित्ताने छावा ट्रेकींग ग्रुपने घेतलेला हा अवयवदानाचा संकल्प समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading