बेकायदेशीर काम थांबवून, कारवाईची मागणी..

दिनांक ३० मे,श्रीगोंदा:

शहरातील पारगाव रोड, देवीच्या मंदिरा जवळ (लोखंडेवाडी) फिरंगाई ओढयामध्ये काही समाजकंटक मुरुम, दगड, गोटे व मातीने ओढा मुजविण्याचा प्रयत्न करत आहेत.

ओढयालगत रहात असलेल्या नागरिकांना, भविष्यात ओढयाला पाणी आल्यास, पुराचे पाणी घरात व शेतात घुसून, सामान्य जनजीवन यामुळे प्रभावित होणार असल्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता स्थानिक वर्तवर आहेत.

येथील लोकांच्या राहत्या कार्यक्षेत्रात जाणिवपुर्वक काही समाजकंटक अतिक्रमण करून ओढा बुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यात आमचे घरं व शेती ओढ्याच्या प्रचंड पुरामुळे वाहून गेल्यास, त्यास शासन जबाबदार राहील. त्यामुळे सदरचे चालू असलेले बेकायदेशीर काम त्वरीत थांबवून ओढयाचा प्रवाह पूर्ववत करावा. तसेच, संबंधीतांवर योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी किसन पांढरकर, ज्ञानदेव आळेकर, मंगल तुगलड, शिवाजी पांढरकर, आप्पा आळेकर, सदाशिव आळेकर, गोरख आळेकर, बाळासो पांढरकर, कैलास पांढरकर, सुरेखा पांढरकर, लता पांढरकर, श्रीराम आळेकर, सुनंदा आळेकर, संजय आळेकर, संपत आळेकर, लक्ष्मी आळेकर, सतीश आळेकर, शिवाजी आळेकर, पोपट आळेकर, राहुल आळेकर, सुनीता आळेकर, भानुदास भुजबळ, अजीनाथ भुजबळ, मंगल पांढरकर, शहाजी आळेकर, अनिता आळेकर, समुद्र आळेकर, शिवानी पांढरकर, विशाल पांढरकर, या स्थानिकांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

या प्रकरणी कारवाई न झाल्यास लॉक डाऊनचे निकष पाळत, आमरण उपोषण करणार असल्याचे, येथील नमूद नागरिकांनी ठरवले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading