मढेवडगावात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार ९१,७०० – रुपये किंमतीच्या मुद्देमालासह श्रीगोंदा पोलिसांकडून जेरबंद..

दिनांक १८ डिसेंबर,(मढेवडगाव,श्रीगोंदा):

दिनांक १० डिसेंबर २० रोजी सकाळी १०:०० वा. चे नंतर ते दिनांक ११ डिसेंबर २० रोजी ७:०० वा. चे दरम्यान मढेवडगाव गावात फिर्यादी देविदास भानुदास ठोंबरे रा. मढेवडगाव ता. श्रीगोंदा यांचे मालकीचे सुनिता किराणा दुकानातुन किराणा माल चोरी गेला होता. तसेच, गावातील राहणारे अमोल संभाजी धावडे रा. मढेवडगाव ता. श्रीगोंदा यांचे मालकीची एक होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटार सायकल असा एकुन १,४६,६८२/ – रु किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत श्रीगोंदा पोलिस स्टेशनला भादवि कलम ४५४, ४५७ व ३८० प्रमाणे दिनांक ११ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या प्रकरणी पोलिस निरीक्षक रामराव ढीकले यांनी गुन्हा उघडकिस आणण्याकरिता गुन्हे प्रगटीकरण पथकास मार्गदर्शन व सुचना केल्या. त्यानुसार दिनांक १६ डिसेंबर रोजी श्रीगोंदा पोलिस स्टेशन गुन्हे प्रगटीकरण पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, सदरचा गुन्हा हा ईसम चिंगळ्या टवक्या काळे वय ४० वर्षे रा. टुलेवस्ती वांगदरी ता. श्रीगोंदा याने व त्याच्या अन्य साथीदारांनी मिळुन केला आहे. त्यानुसार तपास पथकाने चिंगळ्या टवक्या काळे यास टुलेवस्ती वांगदरी येथुन त्याचे राहते घरातुन शितापिने सापळा रचुन ताब्यात घेवुन, त्याच्याकडे दाखल गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, त्याने वरिल प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचे घराची झडती घेतली असता, त्याचे घरात गुन्ह्यातील चोरी केलेला मालापैकी एकुन ९१,७००/ – रु किंमतीचा माल त्यात एक तेलाचा भरलेला डबा व एक मोकळा डबा, एक होंडा कंपनीची युनिकॉर्न मॉडेलची मोटर सायकल नंबर एम एच १६ बी क्यु ८५३४ मिळुन आल्याने, ती पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपीस गुन्ह्यात अटक केली असुन, तपासात त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील (अप्पर पोलिस अधिक्षक) सौरभ कुमार आग्रवाल, (उपविभागीय पोलिस अधिकारी) आण्णासाहेब जाधव, (पोलिस निरीक्षक) रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे श्रीगोंदा तपास पथकाचे (सपोनि) दिलीप तेजनकर, (पोहेका) अंकुश ढवळे, (पोकॉ) प्रकाश मांडगे, (पोकॉ) संजय काळे, (पोकॉ) गोकुळ इंगावले, (पोकॉ) किरण बोराडे, (पोकॉ) दादा टाके, (पोकॉ) विनायक जाधव यांनी केली आहे.

स्रोत:(श्रीगोंदा पोलीसांची प्रेसनोट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading