सुसीमचा वाढदिवस
आज सुसीम सकाळपासूनच आनंदात होता . आज त्याचा थाट वेगळाच होता . अंगावर भरजरी पोशाख , दागिने , डोक्यावर चमचमणारा सुवर्ण मुकूट . अशोक सुसीमला म्हणाला, ” दादा, किती छान दिसतो तुला हा पोषाख ! तू यात खूपच शोभून दिसतोस.” अरे ! माझ्या मातामहांनी हे सर्व माझ्यासाठी पाठविले आहे. ” ” फारच छान ! ” ” बरं का अशोक, असे सुंदर आणि मौल्यवान भेट मिळायला आजोळही तसच श्रीमंत असावं लागतं . तुला माहीत असेलच माझे आजोबा हिमालीचे नृपती आहेत . नाहीतर तुझे आजोबा कंगाल गरीब भिक्षक . ना धड शेती ना राहण्यास चांगला वाडा . झोपडीत राहतात म्हणे . मला सगळे मगधचा भावी राजा म्हणूनच बघतात आणि मी तुझ्यापेक्षा दिसायलाही सुंदर आहे .

नाहीतर तुझा चेहरा बघ किती उग्र आणि रंगही काळा . तू आम्हा सर्व भावंडांत वेगळाच दिसतोस . आमचे आजोळ आणि तुझ्या आजोळात खूप फरक आहे . नाही का ? श्रीमंत आजोळ मिळायलाही भाग्य लागतं. ” सुसीमच्या बोलण्याने अशोकाच्या मनाला इंगळ्या डसाव्यात तसे झाले. अशोकाचे मन अस्वस्थ होत चालले होते. अपमानाने मन व्याकूळ हे सुसीमचे बोलणे अशोकाच्या जिव्हारी लागले .
तो मनातून दुःखी झाला . खरंतर सुसीम सुंदर असला तरी तसा तो भ्याड वृत्तीचा होता . तसा अशोक शूर व सामर्थ्यशाली होता. अशोक सुसीमचे बोलणे ऐकून म्हणाला , ” आपले पिताश्री दिसायला सुंदर आहेत का ? तरी पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आज मगधचे सम्राट आहेत की नाही , आणि मी त्यांचाच मुलगा आहे . ” ” तू कितीही सुंदर दिसलास तरी तू बायकी वाटतोस , तू भित्रा आहेस . ” बोलता बोलता दोघांमध्ये अशी जुंपली असताना जवळ तिष्यबंधू होता . तो दोघांच्या मध्ये पडला . दोघांमधील विकोप वाढला जाऊ नये म्हणून दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करू लागला . तिष्य म्हणाला “ तुम्ही दोघेही चुकत आहात . राजा कसा मनाने मोठा , न्यायी व दयाळू असावा. शौर्यशाली माणसांची मनं जपणारा , प्रेमळ आणि प्रत्येक वेळी दक्ष असावा लागतो. ” तेवढ्यात तेथे महामंत्री खल्लातक आले.
सर्व राजकुमारांवर कौतुकाने दृष्टी फिरवत म्हणाले, ‘ आपण योग्य अशा विषयावर चर्चा करीत आहात . आनंद वाटला . ‘ तेव्हा सुसीम म्हणाला, “ महामंत्री खल्लातक आपले या बाबत मत काय ? ” दोघांचे मत ऐकून घेतल्यावर महामंत्री खल्लातक म्हणाले, ” अशोकाची बाजू न्यायाची आणि खरी वाटते . ” सुसीमला खूप राग आला आणि आपल्या हातातील अंगठी महामंत्र्यांच्या डोक्यावर जोरात मारली . तेव्हा त्यांचं डोकं फुटलं आणि रक्त वाहू लागले . तेव्हा अशोकाने मागचा पुढचा विचार न करता आपले उत्तरीय (वस्त्र) फाडून महामंत्र्याची जखम घट्ट बांधली. तिष्य मात्र वैद्यराज यांना बोलावण्यासाठी निघून गेला. हा प्रसंग काय सांगतो – अशोक क्रूर नसून दयाळू होता. प्रसंगावधान राखून काम करीत होता .

तो चंड नसून प्रेमळ व दयाळू होता. अशोक क्रूर केव्हा होतो जेव्हा त्याला तशी परिस्थिती तयार करते. खरोखर अपमानीत केल्यावर कोणाला राग येणार नाही. खरोखरच मातेच्या मनाचा कोमल पण आणि वडिलांचा रागटपणा या दोन्ही गोष्टी अशोकमध्ये होत्या…
क्रमशः
स्रोत:(प्रजापिता सम्राट अशोक या श्रीनिवास भालेराव यांच्या पुस्तकातुन)
