दिनांक १५ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात “अशोक विजयादशमी” म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या ५ लक्ष अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. ती धम्मभूमी सध्या दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. डॉ.आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त होत चाललेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले.
बहुजन समता पत्र परिवाराकडून सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
