दिनांक १५ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ४७ वा गळीत हंगाम शुभारंभ काल दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहूजी कानडे, माधवराव कानवडे यांचेसह संचालक मंडळातील पदाधिकारी तसेच, चेअरमन राजेंद्र नागवडे व अनुराधाताई नागवडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी भुषवले.

उपस्थित शेतकरी बांधवांना ज्ञानदेव वाफारे, (आमदार) लहूजी कानडे, (आमदार) डॉ. सुधीरजी तांबे, माधवराव कानवडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्यासाठी स्वर्गीय बापुंनी केलेल्या संघर्षाबाबत माहिती नमूद केली. तालुक्यासह जिल्हा आणि राज्यातील साखर कारखाना चळवळीला मार्गदर्शन ठरेल, असे कार्य बापूंनी केल्याचे त्यांनी नमूद केले. बापूंची शिकवण त्यांची आठवण आणि त्यांनी दाखवला मार्ग हा सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी बोलतांना नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना राजेंद्र नागवडे म्हणाले की, आसपासचे कारखाने शेतकऱ्यांना चांगला भाव देत असून, आपल्या कारखान्याची गाळप क्षमता वाढल्यास भाव देता येईल. आपल्या कार्यक्षेत्रात शेतकरी काही कारणास्तव ऊस लागवडी पासून दूर जाताना दिसत आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, कारखान्यातील ९० कामगारांना मागील वर्षी कायमस्वरूपी रुजू करण्यात आले आहे. कारखान्यातील सर्व विभागात सुसूत्रता आणि नियोजन ठेवून कारखाना सुरळीत पद्धतीने चालेल यावर विशेष भर देण्यात आला आहे. ऊस तोड कामगार, शेतकरी व कारखाना कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल.? असे धोरणात्मक कार्य संचालक मंडळाने हाती घेतले आहे. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्यावर सर्व सभासदांचा पूर्ण विश्वास आहे. ऊस तोडणी पासून एफआरपी पर्यंत आजतागायत कसलीही अडचण आलेली नाही. आणि भविष्यातही अडचण येणार नाही. अशी खबरदारी आम्ही घेत आहोत. असे नागवडे यांनी नमूद केले. कोरोनाच्या आपत्तीमध्ये कारखाना प्रशासन अडचणीत असतांनाही तालुक्यातील ग्रामपंचायतीनां प्रत्येकी दहा हजार रुपये तर, नगरपालिकेला ५० हजार रुपये देण्याचे कार्य केले आहे. व्हीलचेअर, स्ट्रेचर, ऑक्सिजन सिलेंडर देण्याचे काम केले आहे. तसेच, नागवडे सहकारी कारखान्याच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर उभारून सर्वसामान्यांना मदत करण्याचे कार्य केले आहे. स्वर्गीय बापूंनी तालुक्यातील उपेक्षित, शेतकरी बांधवांच्या सुखदुःखात, मुलांच्या शिक्षणात उभे राहत मदत करण्याचे कार्य केले आहे. असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
या कार्यक्रमासाठी अनुराधाताई नागवडे, बाबासाहेब भोस, ज्ञानदेव वाफारे, हरिदास आबा शिर्के, सुभाष शिंदे, प्रेमकाक भोईटे, दीनुकाका पंधरकर, शुभांगीताई पोटे, कैलास तात्या पाचपुते, राजेंद्र (आब मस्के, केशव भाऊ मगर, जिजा (बापू) शिंदे, अण्णासाहेब शेलार, स्मितल (भैया) वाबळे, बाळासाहेब दुतारे यांचे सह कारखाना सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
