श्रीगोंदा नगरपालिकेने मोकाट कुत्री, मांजरं, जनावरांसह दारू पिऊन झिंगणाऱ्या दारूड्यांना झोपण्यासाठी व टवाळखोरांना गोवा, गुटख्याने भिंती रंगवण्यासाठी ही कोट्यावधीची इमारत बांधली काय..?: आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सवाल..

दिनांक १५ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
शहरातील सिद्धार्थनगर येथे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर स्वरूपाला आलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे भवन स्थानिकांच्या गैरवापरामुळे घाणीच्या विळख्यात सापडले आहे. स्थानिक नगरपालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष करतांना दिसते. टवळखोरांनी गोवा, गुटखा, मावा खाऊन रंगवलेल्या भिंती, दारू पिऊन लोळनारी तळीरामं आणि कार्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे दुरवस्थेच्या कगारवर जाऊन पोहोचलेले हे स्मारक पाहून, कोणालाही प्रशासनाने खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीबाबत कीव येईल.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्रीगोंद्यात प्रवासादरम्यान आले होते. ज्या ठिकाणी ते थांबले होते. त्या कार्यक्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे. अशी, अनेकांची इच्छा होती. Ad. संभाजीराव बोरुडे व त्यांच्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी याबाबत कागदोपत्री पाठपुरावा व आंदोलनं केल्यानंतर सदरील स्मारक बांधण्याचा मार्ग खुला झाला होता.

अनेक दिवस वादाच्या गर्तेत अटकलेले हे स्मारक अखेर पूर्ण झाले. त्याचे लोकार्पणही झाले. मात्र, तेंव्हापासून स्थानिक नगरपालिका प्रशासनाचे या स्मारकाच्या दुरुस्ती, देखभालीकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच समाज बांधवातील काही विघ्नसंतोषी लोकं येथेच घाण करण्याच्या उद्देशाने (इमारती) स्मारकाचा गैरवापर करीत आहेत. दिवसभर झिंगणारी तळीरामं, गोवा, गुटखा, खर्रा खाऊन थुंकणारी टवाळखोरं आणि भटकी कुत्री, मांजरं अनं जानवरं एकत्रित बसण्याचे ठिकाण होऊन बसलेल्या या स्मारकाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.

अनेक संघर्ष व आंदोलनाचे फलित असलेल्या या इमारतीकडे होणाऱ्या दुर्लक्ष भूमिकेविरोधात लवकरच जन आंदोलन करण्याच्या तयारीत काही संघटना असल्याची माहिती मिळत आहे. जर, हे स्मारक भटक्या स्वानं, मोकाट जनावरं, दारू पिऊन झोपणारी इसमं व टूकार फिरणाऱ्या तरुणाईच्या विळख्यात सापडले असेल. तर, स्थानिक नगरपालिका प्रशासनाला लागलेल्या झोपेला वास्तविक शुद्धीत आणण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचेही मत जाणकार कार्यकर्त्यांनी नोंदवले आहे.
स्रोत:(स्मारकाची सध्य स्थिती)

