दिनांक २९ जानेवारी, श्रीगोंदा:
कोकणगाव (ता. श्रीगोंदा) गावचे सुपुत्र, सध्या मुंबई शहर पोलीस दलात पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेले आप्पासाहेब बबन हंडाळ यांनी त्यांचे दैनंदीन कर्तव्य सांभाळून सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या प्राध्यापक पत्रता परिक्षेत (सेट) राज्यशास्त्र या विषयात ते पास झाले आहेत.
त्यांचे माध्यमिक शिक्षण पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, आढळगाव, न्यू इंग्लिश स्कूल, शिंदे येथे झाले असून, उच्च माध्यमिक शिक्षण श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे झाले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ, नाशिक येथून राज्यशास्त्र या विषयात पदवी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथून राज्यशास्त्र या विषयात पदवीव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तसेच, ते मघराष्ट्रातील नामांकित सिद्धार्थ विधी महाविद्यालय, मुंबई येथून एल. एल. बी.चे शिक्षण पूर्ण करीत आहेत.
web Tital: Sub-Inspector of Police Appasaheb Handal, passed the set examination..!
त्यांचे मोठे बंधू चांगदेव हंडाळ हे मिरा – भाईंदर पोलिस आयुक्तालयात पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असून, त्यांनी कोकणगाव सारख्या ग्रामीण मेंढपाळ व शेतकरी कुटूंबात शिक्षण घेऊन, यश प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
