दिनांक १७ जून,श्रीगोंदा:
सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन चालु आहे.रोजगार बंद असल्याने लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अश्यातच तालुक्यातील सर्व फायनांन्स कंपन्यांण्या व बचत गट अधिकारी लोकांना दमदाटी करुन हप्ते मागत आहेत.या अधिकाऱ्यांच्या आडग्या भूमिके विरोधात श्रीगोंदा तहसिल व पोलिस स्टेशन यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
या नंतर फायनान्स आधिकाऱ्यांना भेटुन सामान्य माणसास होणारी दमदाटी व चालेली वसुली त्वरीत तीन महिन्यांपर्यंत बंद करा.नाहीतर, शिवसेनेचा व युवासेनेचा दणका दाखवला जाईल. असे आवाहन करीत सांगण्यात आले आहे.त्यांना सध्या प्रेमाने निवेदन दिले आहे. हे न थांबल्यास ह्या कंपन्यानी पुढे होण्याऱ्या गंभीर परीणामास जबाबदार रहावे अशी कळकळीचे आश्वासन देण्यात आले आहे.
नमूद निवेदन देतांना संतोष शिंदे (उपतालुका प्रमुख शिवसेना), समवेत(तालुका प्रमुख) भाऊसाहेब गोरे,(युवासेना उपजिल्हा प्रमुख) बाळासाहेब दुतारे,(शिवसेना शहरप्रमुख)संतोष खेतमाळीस, (युवासेना तालुका प्रमुख) हरीभाऊ काळे,नाथा पवार,मयुर चव्हाण,शुभम जामले, समीर काझी,ओंकार शिंदे,राहुल भालेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
