मढेवडगाव येथे फूड्स मॉलचे खासदार सुजय विखे यांच्या हस्ते उद्घाटन.

दिनांक १७ जून,(मढेवडगाव,श्रीगोंदा):

खासदार सुजय विखे हे १६ जून रोजी श्रीगोंदा दौऱ्यावर आले होते.त्यांनी श्रीगोंदयात साबळे हॉस्पिटल उदघाटन करून काष्टी येथे कालकथीत शिवरामअण्णा पाचपुते व बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जेष्ठ नेते कैलास तात्या पाचपुते व वैभव पाचपुते यांची व कुटुंबाची भेट घेऊन धीर दिला.

नगरला जातानां मढेवडगाव कृषी पणन प्रक्रिया, डाळमील सहकारी संस्थेच्या प्रभा ऍग्रो फूड्स या फुडमॉलच उदघाटन खासदार सुजय विखेे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अंबादास मांडे,नामदेवराव मांडे, फुलसिंग मांडे, बाळासाहेब नाहाटा, गणेश मांडे, साहेबराव उंडे, अमोल गाढवे, दिपक गाडे, सचिन उंडे, संतोष मांडे, प्रकाश उंडे, लक्ष्मण मांडे, भगवान धावडे, शुभम मांडे, दत्तात्रय शिंदे, बनकर सर, हरी उंडे, विक्रम मांडे, प्रदीप जगताप, प्रज्वल बनकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading