“प्रहार जनशक्ती पक्षा”च्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर.

दिनांक १९ मे,श्रीगोंदा:

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज तहसीलदार महेंद्र माळी यांना वामनभाऊ भदे (जिल्हा उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर) यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे २०१९ मधील ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यातील जोरदार पाऊसाने नुकसान झाले होते. त्यावेळी तालुक्यातील ४५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विमा भरला होता.हेक्टरी २५००० रू. प्रमाणे पैसे मिळनार होते. ११ कोटी २५ लाख रूपये इतकी रक्कम अंदाजे तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असतांना. त्यांना तो मिळू शकला नाही.

या विषयावर म्हस्के (कुषी अधिकारी, श्रीगोंदा) व भोसले (कृषी विभाग अहमदनगर) यांच्या बरोबर चर्चा केली. बच्चुभाऊ कडु (राज्य मंत्री) यांच्या विचाराने श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणताही संविधानिक संघर्ष करावा लागला.तरी, प्रहार सैनिक व प्रहार पदाधिकारी मैदानात उतरल्या शिवाय रहनारा नाहीत. खरे तर श्रीगोंदा तालुक्यातील विद्यमान आमदारांनी हा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता.पण त्याचे श्रीगोंदा तालुक्याकडे पुर्ण दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यातील पुढारी फक्त मताचा जोगवा मागण्यापुरतेच बाहेर पडतात.असे मत प्रहार चे वामन भदे यांनी व्यक्त केले आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, गोरगरीब जनतेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष सतत संघर्ष करीत आहे. तहसीलदार श्रीगोंदा व कुषी अधिकारी श्रीगोंदा यांनी याविषयी गंभीरपणे लक्ष घालुन शेतकऱ्यांना न्याय मिळवुन द्यावा.अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी या याप्रकरणी जण आदोलंन करतील.असे नमुद करण्यात आले आहे.

तहसीलदार महेंद्र माळी यांना दिलेल्या निवेदनावर वामनभाऊ भदे (जिल्हा उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर), (तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष श्रीगोंदा) कुष्णाभाऊ खामकर, बाबासाहेब दरोडे,(उपाध्यक्ष प्रहार संघटना), मानवभाऊ बनसोडे (अध्यक्ष श्रीगोंदा शहर), बाळासाहेब वाळके पाटील, गंगाधर दरोडे पाटील, नितीनभाऊ काबळे, विश्वासभाऊ सुडगे यांनी सह्या केल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading