दिनांक २० मे,श्रीगोंदा:
पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस येत असलेल्या शब – ए – कद्र अर्थात ईबादत करण्याची मोठी रात्र. या शब – ए – कद्र निमित्त तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्रच लॉक डाऊन चालू असल्याने आपल्यालाही त्याचे पालन करायचे आहे. तेंव्हा सर्व मुस्लिम बांधवांनी शब – ए – कद्र आपापल्या घरीच साजरी करावी.भरपूर इबादत करून, आपल्या कडून कळत न कळत घडलेल्या चुकांची माफी मागण्या बरोबरच,संपूर्ण मुल्क व मानव जातीच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मशीद अथवा कब्रस्तान मध्ये जाऊ नये. फिजीकल आंतराचे पालन करावे, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या तालुक्यात कोरोनाला रोखण्यात मुस्लिम बांधवांचे मोठे योगदान व सहकार्य आहे. यापुढेही आपण सर्व मिळून कोरोनास तालुक्या बाहेरच ठेवण्याचा प्रयत्न करू.
