मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत जान्हवी प्रमोद शेंडगे हिची गगनभरारी.

दिनांक २० मे (एरंडोली,श्रीगोंदा):

राज्य स्थरिय मंथन प्रज्ञाशोध परिक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एरंडोली, श्रीगोंदा या शाळेतील विद्यार्थीनी कु. जान्हवी प्रमोद शेंडगे इयत्ता ३ री हिने ३०० पैकी २८६ गूण मिळवून, बेलवंडी केंद्रात प्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक मिळवत श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, एरंडोली शाळेची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

या यशामागे (गट शिक्षणाधिकारी) गुलाबराव सय्यद यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.(केंद्रप्रमुख) कलगुंडे,(वर्गशिक्षक) गंगाधर शेळकेसर, (मुख्याध्यापक) रमेश साबळे यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती व एरंडोली ग्रामस्थांनी सर्व शिक्षकवृंदांचे विशेष आभार मानले असून,यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते संजय चांदणे, शिवाजी बुलाखे, प्रमोद शेंडगे, चंद्रकांत सकट, खुशाल सकट यांनीही जान्हवीच्या यशा बद्दल कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading