कराटे स्पर्धेत महादजी शिंदे विद्यालयाचे यश.

दिनांक ५ मार्च,श्रीगोंदा:

‘दि इंडियन पॉवर मार्शल आर्ट असोसिएशन’ महाराष्ट्र यांच्या वतीने २९ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी बारामती येथे पुणे विभागीय खुल्या कराटे स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेचे श्रीगोंदा येथील महादजी शिंदे इंग्लिश मेडिअम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ३ सुवर्णपदके, ६ रौप्यपदके आणि २ कांस्यपदके मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.या स्पर्धेमध्ये पुणे विभागातील (पुणे,सोलापूर, अहमदनगर, पिंपरी चिंचवड) येथील सुमारे २५६ खेळाडू सहभागी झाले होते.

ऋग्वेद कोथिंबीरे , अथर्व घायाळ , पूर्वा घायाळ यांनी सुवर्णपदके मिळविली. सुजल मेथा , साईराज वाळके , रेहान खान , कुणाल कदम , आरव कुलकर्णी , स्वराज्य भागवत हे रौप्य पदकाची मानकरी ठरले.तर,हर्षवर्धन गांगर्डे,अक्षरा बळे यांनी कांस्यपदके पटकावली.विजयी खेळाडूंना मास्टर जयेश आनंदकर यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस , कुंडलीकराव दरेकर , तुकाराम दरेकर , रवि दंडनाईक , ज्योत्स्ना भंडारी , ग्रँडमास्टर संजय आनंदकर , मुख्याध्यापक नितीन शिंदे,ज्योती भोपे यांसह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

विजयी खेळाडूंबरोबर प्रशिक्षक जयेश आनंदकर, नितीन शिंदे,ज्योती भोपे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading