दिनांक ६ मार्च(घारगाव,श्रीगोंदा):
बुधवार दि. ४ मार्च रोजी अहमदनगर येथे पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी (घारगाव) ता.श्रीगोंदा यांनी लहान गटात घवघवीत यश संपादन करून,द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
शिंदेवाडी ही उपक्रमशील शाळा असून,शाळेमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात. शाळेत १ ते ४ वर्ग असून,सदरील शाळेचे मुख्याध्यापक संजय रायकर व सहशिक्षिका सोनाली रणदिवे यांनी स्वतः व लोक सहभागातून संपूर्ण शाळेचा कायापालट केला आहे.
सदरील शाळेतील २६ पैकी २० विद्यार्थ्यांनी अ. नगर येथे पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता.संत गोरा कुंभार नाटिका व दिंडी नृत्य सादर करून,उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट सह भरभरून दाद देत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेत शाळेचे अभिनंदन केले.
यावेळी(मुख्य कार्यकारी अधिकारी)जगन्नाथ भोर, (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) वासुदेव सोळंके,(जिल्हा परिषद अध्यक्ष)राजश्री घुले, (शिक्षण अधिकारी) रमाकांत काठमोरे,(उपशिक्षण अधिकारी) अरुण धामणे,(शिक्षण विस्तार अधिकारी)ज्ञानेश्वर कलगुंडे,(गट शिक्षणाधिकारी)गुलाब सय्यद,(घारगाव चे सरपंच) अरुणा खोमणे,(माजी उपसरपंच)नारायण खामकर,(शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) विजय शिंदे,सोमनाथ शिंदे,रमेश शिंदे,अमोल पाटोळे,सुरेश शिंदे किशोर पवार,सोपान शिंदे,संतोष खडके,नवनाथ शिंदे,अप्पासाहेब शिंदे सर्व सदस्य व ग्रामस्थ मुख्याध्यापक संजय रायकर सह शिक्षिका सोनाली रणदिवे यांनी सर्व मुलांचे कौतुक केले.
