श्रीगोंदयाच्या यात्रेला कोरोनाची भीती ? चीनला शिक्षणासाठी गेलेला विद्यार्थी श्रीगोंदयात परतलाय ! सर्दी,खोकला,ताप असलेल्या इसमांनी गर्दी ठिकाणी जाणे टाळा: नितीन खामकर(आरोग्य अधिकारी)..

दिनांक ६ मार्च श्रीगोंदा:

कोरोणा प्रादुर्भावाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले असताना, त्याचे संशयित रुग्ण भारतासह महाराष्ट्रातील काही जिल्हे व आसपासच्या परिसरात असल्याचे बोलले जात आहे.सर्दी-खोकला-ताप असे लक्षण असलेल्या व इटली सह चीनच्या प्रांतातून परत आलेल्या काही लोकांना संशयीत म्हणून,उपचारा साठी दवाखान्यात दाखल केल्याचे सर्वश्रुत आहे.

प्रशासनाने याविषयीच्या बैठका घेत उद्भवनाऱ्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे ठरवल्याचे समजले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गर्दीत या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने,गर्दी करणे टाळणे आवश्यक आहे. शिवाय शासन स्तरावर याविषयी सूचना करण्यात येत आहेत.

त्यात,श्रीगोंद्यात होऊ घातलेल्या संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सवामध्ये लाखोच्या संख्येने जनसमुदाय एकत्रित येत हा महोत्सव ६ व ७ मार्च रोजी साजरा करणार आहेत.अशा गर्दीच्या ठिकाणी प्रादुर्भावाची शक्यता जास्त असल्याने सर्दी,खोकला व ताप असलेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.जेणेकरून त्याचे संक्रमण इतर लोकांना होण्यापासून बचाव होईल. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवा फडके लावावे,यामुळे प्रादुर्भाव टाळता येईल.यात्रेच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी खेळणी,वस्तू,पाळणे,कपडे खरेदी करतांना निरनिराळ्या लोकांचे हात संबंधित वस्तूला लागतात शक्यतो त्या वस्तू हाताळल्या नंतर आपले हात स्वच्छ धुणे अपेक्षित असल्याचेही आरोग्य अधिकारी यांनी विशेष नमूद केले आहे.वाढत्या तापमानामुळे सध्यातरी कार्यक्षेत्रात नमूद कोरोना आजाराचा धोका होऊ शकणार नसल्याचे,डॉक्टरांचे म्हणने आहे.शेख महंमद बाबा यात्रेत आरोग्य विभागा मार्फत एक कक्ष स्थापन केला आहे. याठिकाणी आजाराच्या काळजी संदर्भात आरोग्य विभागामार्फत जाहीर सूचना देण्यात येणार आहेत.

गेल्या महिन्यात चीनला शिक्षणासाठी गेलेला एक विद्यार्थी श्रीगोंदयात परतला असल्याची माहिती मिळत आहे.मात्र,मायदेशी येतांना अनेक ठिकाणी विमानतळावर त्याचे परीक्षण करण्यात आले असून,त्यात त्याला कोणत्याही प्रकारची लागण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.शिवाय,तो सध्याही तंदुरुस्त असल्याचे समजते आहे.

Leave a Reply