राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनभुले इच्छुक..[उत्तर महाराष्ट्राला पद मिळणार का?

दिनांक ६ मार्च ,श्रीगोंदा:

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर,रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्यात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.या रिक्त झालेल्या पदासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे युवा नेते व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय अनभुले यांचे नाव वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.त्याच बरोबर पुणे,औरंगाबाद , नांदेड,बीड येथील युवक नेतेही स्पर्धत आहेत.

अक्षय अनभुले हे राज्य सरचिटणीस म्हणून काम करत असताना,त्यांनी अहमदनगर जिल्ह्यासह पुणे,धुळे,नंदुरबार निरीक्षक म्हणून आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून पक्षाचे विचार आणि संघटना बांधण्याचे काम केले आहे.सत्ता नसतानाही पक्षात एकनिष्ठ राहून सर्वसामान्य जनतेचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले आहे. विध्यार्थ्यांना अडकलेली शिष्यवृत्ती विरोधातील आंदोलन चांगले गाजले आणि विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली.त्याचप्रमाणे पेट्रोल गॅस दरवाढ,महाविद्यालय शुल्क दरवाढ,विध्यार्थ्यांना पार्किंग मोफत झाली पाहिजे,महापोर्टल बंद,डिप्लोमा विद्यार्थ्यांची डिग्री प्रवेशासाठी टक्केवारी कमी न करता वाढवावी,तसेच पुणे पिंपरी चिंचवड शहरात,पुणे विद्यापीठ येथे देखील विध्यार्थ्यांच्या आणि भाजपा विरोधात विविध आंदोलने केली आहेत.

शरद पवार साहेबांची सर्वसामान्य युवकांनी राजकारणात यावे अशी अपेक्षा आहे.ज्याप्रमाणे युवक प्रदेशाध्यक्ष सर्वसामान्य घरातील व्यक्तीला देण्यात आले.त्याचप्रमाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद हे सर्वसामान्य घरातील अक्षय अनभुले यांना मिळून नगर दक्षिण व अर्थात उत्तर महाराष्ट्राला संधी मिळायला हवी.अशी मागणी विद्यार्थ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये जोर धरत आहे.

Leave a Reply