दिनांक ३ जून,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नागरिकांना तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्फत सूचना देण्यात येत आहे की,कोरोना नंतर दुसरे संकट निसर्ग चक्री वादळाचे येऊ शकते.३ ते ६ जून दरम्यान वादळामुळे नुकसान होऊ शकते. म्हणून, सर्व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
आज दिनांक ३ जून रोजी दुपारी वादळ येऊ शकते, मुसळधार पाऊस येऊ शकतो. अशी हवामानाची शक्यता आहे. परंतु, नागरिकांनी आपल्या स्तरावर काळजी घेणे गरजेचे असल्याचे तहसीलदार माळी यांनी सांगितले आहे.
📌 या आपत्ती मध्ये काय काळजी घ्यावी:
* नागरिकांनी कृपया सुरक्षित ठिकाणी घरीच थांबावे, कोणाकडे जनावरे असतील तर सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, वाहने सुरक्षित ठिकाणी लावावे.
* शेतकऱ्यांनी उडून जाईल असे सामान सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, लहान मुले, वयोवृद्ध यांची विशेष काळजी घ्यावी, वीजपुरवठा देखील खंडित होऊ शकतो, फोन charge करून ठेवावे, अत्यावश्यक लागणाऱ्या सर्व वस्तू जवळ ठेवा.
* प्रशासन हे तुमच्या सोबत आहे.घाबरून जाऊ नये.काही सूचना असल्यास कळवावे.
तालुका नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक:
1) पवार मॅडम,(अप्पर तहसीलदार): 8208060576,
2)ढोले मॅडम,(नायब तहसीलदार): 9420486745,
3)होगले, लिपिक: 9527134904,
4) तहसील कार्यालय: 02487222322
स्रोत: तहसिल कार्यालय,श्रीगोंदा..
