दिनांक १८ जानेवारी २०२४,श्रीगोंदा:
आरोपी नामे राहूल सुरेश भोसले वय ३३ वर्षे, रा. अजंठानगर चिंचवड पुणे याने पत्नीस ठार मारल्या प्रकरणी श्रीगोंदा येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मुजीब एस. शेख साहेब यांनी भा.द.वि. ३०२ अन्वये आरोपी यास दोषी धरले. त्या नुसार आरोपीस भादवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप तसेच रक्कम रुपये ५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली तसेच भादवि कलम ३२४ अन्वये २ वर्षे कैदेची शिक्षा व दंड रुपये १ हजार रुपये व दंड न भरल्यास १ महिनेची साधी कैदेची शिक्षा सुनावली. सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. संगिता अनिल ढगे यांनी पाहिले.

घटणेची थोडक्यात हकिकत अशी आहे की, आरोपी राहूल सुरेश भोसले, वय ३३ वर्षे, रा. अजंठानगर, चिंचवड पुणे हा दिनांक २२/१०/२०२१ रोजी पत्नी नामे दिपाली सुरेश भोसले हिस भेटणेसाठी साईनाथ कलेक्शन सिध्दटेक रोड, राशिन येथे आला होता. सकाळी ९ :३० वाजेच्या सुमारास आरोपीने पत्नीस दिपाली हिस मोबाईल मागिताला. परंतु, तिच्याकडे त्याचा मोबाईल नसल्याने त्याने तिला एक चापट मारली व त्यानंतर त्याच्या जवळील चाकुने पत्नी दिपालीच्या गळ्यावर वार करुन तिस जखमी केले.
ती जमीनीवर पडली त्यावेळी तिची बहिन फिर्यादी तिला वाचवण्यासाठी गेली असता तिला ही कपाळावर आरोपीने डोळ्याच्या बाजुला वार करुन तिस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळे आरोपी फिर्यादीस पोटात चाकु मारित असतांना फिर्यादीने तिच्या जवळील जेवणाच्या डब्याने आरोपीस मारहाण केल्याने तो चाकु सोबत घेवुन पळुन गेला व फिर्यादीने आरडा ओरडा केल्याने तसेच फिर्यादीने तिची दुसरी बहीन रुपालीस हीस फोन करुन घटनेची माहीती दिली व नंतर मयत दिपाली हिस दवाखाण्यात नेत असतांना रस्त्यातच ती मयत झाली.

त्या नंतर घटनेची फिर्याद लता बारकु उर्फ गंगाराम आढाव रा. राशिन यांनी आरोपी विरुध्द दिनांक २२/१०/२०२१ रोजी फिर्याद दिली व त्यावरुन भा.द.वि. कलम ३०२, ३०७, ३२३ गुन्हाची नोंद कर्जत पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. मयत दिपाली हिचे आरोपी सोबत १५/०७/२०१२ रोजी लग्न झालेले होते. व तिला आरोपी पासुन १ मुलगा व १ मुलगी अशी दोन अपत्य झालेले आहेत.
मयत दिपाली ही जुन २०२१ मध्ये माहेरी आली होती व तिने आरोपी विरुध्द भरोसा सेल कर्जत येथे शाररिक व मानसिक छळाची तक्रार दिलेली होती. त्यानूसार आरोपी विरुध्द कर्जत पोलीस स्टेशनला छळा बाबतचा गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीं विरुध्द पोलीस निरिक्षक श्री. सतिष गावित व डी. एस. मुंडे यांनी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा न्यायाधीश २ श्री. मुजीब. एस. शेख साहेब, यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, साक्षीदार, वैद्यकीय अधिकरी, तपासी अधिकारी व पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. नमूद खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता सौ. संगिता अनिल ढगे यांनी काम पाहिले. मा. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी अभियोक्ताचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मा. न्यायालयाने आरोपींना सदरील प्रमाणे शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी सौ. आशा खामकर यांनी सहकार्य केले.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)
