वडील व भावाचा मारेकरी बेलवंडी पोलीसांकडुन अवघ्या ८ तासात ताब्यात..

दिनांक २० जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी रात्री १२:३० च्या सुमारास सुरेगाव ता श्रीगोंदा येथे खून झाल्याची प्राथमिक माहिती त्यांना प्राप्त झाली. त्याप्रमाणे बेलवंडी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे हे पोलीस स्टेशनाच्या स्टाफासह रवाना होवुन सुरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच्या पाठीमागे राहणारा घडयाळ्या हिरामण चव्हाण याचे घरी जावुन चौकशी केली असता आरोपी नामे जावेद घडयाळया चव्हाण याने पत्नी वर्षा हिला घरी नांदण्यासाठी वडील घडयाळया हिरामन चव्हाण यांचेकडे पैसे मागितले.. ते पैसे न दिल्याचे कारणावरुन आरोपी जावेद चव्हाण याने हातातील चाकुने त्याचे वडील घडयाळया हिरामण चव्हाण याचे छातीवर मारुन जागीच ठार केले. तसेच, भाउ महावीर घडयाळया चव्हाण हा वडीलांना वाचविण्यासाठी आला असता त्याच्या मानेवर व कानाजवळ वार करुन गंभीर दुखापत करुन ठार केले.

सदर चा गुन्हा करुन आरोपी नामें जावेद घडयाळ्या चव्हाण हा कोठेतरी पळुन गेला होता. माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब व उपविभागीय कर्जत विभाग पोलिस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे साहेब यांनी घटनास्थळी भेट देवून, आरोपी जावेद चव्हाण यास पकडण्याबाबत सुचना दिल्याने आरोपीच्या शोधार्थ बेलवंडी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे व स्थागुशा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर आरोपी जावेद चव्हाण याचा शोध घेण्याच्या सुचना देवुन पथक रवाना केले.

पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी गोपनिय बातमी मिळाली की, जावेद चव्हाण हा विसापुर येथे येणार आहे. तात्काळ बेलवंडी पोलीस स्टेशन चे पोसई राजेंद्र चाटे, पो हे का हसन शेख, पोहेकॉ भाउसाहेब यमगर, मपोना सुरेखा वलवे, पोकॉ. कैलास शिपनकर नेमून यांनी व स्थागुशा अहमदनगर चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी मानवी कौशल्य वापर करुन अवघ्या ८ तासात आरोपीस हत्यारासह विसापुर गावातील चौकात शिताफीने ताब्यात घेतलले. नमूद आरोपीस गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता, त्याने खुन केल्याचे कबूल केले आहे. सदर गुन्हयाचा सखोल तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे हे करत आहे.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब व उपविभागीय कर्जत विभाग पोलिस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे साहेब यांच्या मार्गदर्शनात बेलवंडी पोस्टेचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे व पोलीस निरीक्षक स्थागुक्षा दिनेश आहेर यांच्या समन्वयातून पोसई राजेंद्र चाटे, पो हे का हसन शेख, पोहेकॉ भाऊसाहेब यमगर, पोहकॉ नंदकुमार पठारे, पौना शरद गांगर्ड, मपौना सुरेखा वलवे, म.पो.ना कविता माने, पोकॉ, कैलास शीपणकर, चापोहकॉ भाउसाहेब शिंदे नेमणूक बेलवंडी पोस्टे, स्थागुक्षा अहमदनगर येथील पोसई सोपान गोरे, पोहेकों फोलाणे, पोहेकों विशाल दळवी, पोहेकों संभाजी कोतकर, पोना भिमराज खर्स, पोकों रविंद्र घुंगासे, पोकों अमोल कोतकर, पोकों भाउसाहेब काळे नेम स्थागुशा अहमदनगर यांनी केली आहे.

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading