दिनांक १९ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
स्व. शिवाजीराव नागवडे तथा बापु यांच्या ९० व्या जयंती सोहळ्या निमीत्त आयोजित कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या जयंती सोहळा कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे होते.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते, नगर तालुक्याचे आमदार संग्राम भैया जगताप, दौंडचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात, आमदार निलेश लंके, अनुराधाताई नागवडे, सीताराम गायकर, बाबासाहेब भोस, दिपकशेठ नागवडे, बाळासाहेब नहाटा, शुभांगीताई पोटे, दिपक शिर्के, ज्योतीताई खेडकर, बाळासाहेब दुतारे, कैलास पाचपुते, दादा पाटिल फराटे, शरद नवले, भगवान पाचपुते, अनिल ठवाळ इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रस्ताविक बाबासाहेब भोस यांनी केले. त्यांनी नमूद केले की, बापूंची ९० वी जयंती साजरी होताना आनंद होतोय. वयाच्या २४ व्या वर्षी बापूंनी समाजकारण आणि राजकारणास सुरुवात केली. दूरदृष्टीचा नेता म्हणुन त्यांनी पाण्यासाठी आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना उभा करण्यासाठी सकारात्मक पाऊलं उचलले, तालुक्यातील बहुजनांच्या आणि सर्वांच्या मुलांना शिकण्यासाठी शिक्षण संस्था स्थापन केली. श्रीगोंद्यात प्रथम पॉलिटिकल काढले.. दूर दृष्टीचा नेता म्हणुन तालुका बापूंना पाहतो.. जिल्ह्यातील नामांकित व्यक्तिमत्त्वाच्या बरोबरीने त्यांनी सहकाराची निव ठेवली.. ज्या संस्था बापूंनी उभा केल्या त्या अविरत चालवण्याचे प्रयत्न राजेंद्र नागवडे आणि त्यांचे कुटुंब करीत आहेत.
या प्रसंगी राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते अजित दादा पवार यांचा सन्मान करण्यात आला. बाबासाहेब भोस यांच्या हस्ते आ.संग्राम जगताप, आमदार बबनराव पाचपुते यांचा अनुराधाताई नागवडे यांनी सन्मान केला..
यावेळी बबनराव पाचपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी नमूद केले की, पूर्वी राजकीय निमित्ताने मतभेत होते. मात्र, मनभेद नव्हते.. अनेक राजकीय विरोधाभास झाले. बापूंनी समाज.. आणि मानसं निर्माण केली.. धाडशी वृत्तीमुळे कामं करण्याची संधी निर्माण झाली आहे. असे पवार दादां बाबत मनोगत व्यक्त केले. विसापूरला पाणी सोडण्यासाठी केलेल्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याबद्दल दादांनी आभार व्यक्त केले. बापूंच्या जयंती निमित्त सर्वांचे स्वागत करून बापूंना आदरांजली अर्पण केली.
राजेंद्र दादा नागवडे यांनी अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले की, बापूंनी तालुक्यातील सर्वांना आशीर्वाद दिला आहे. बापूंच्या प्रयत्नांतून सहकार कारखान्याची उभारणी केली.. शिक्षण संस्थांमधुन हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे जात आहेत. कुकडीच्या पाण्यासाठी लढा उभारून तालुका सुजलाम करण्याचा निर्धार केला. तालुका कार्यक्षेत्रातील विविध जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. सर्वसामान्यांच्या जीवनमानात मोठा बदल अनुभवायला मिळाला.

नागवडे कुटुंबाने अनेक सामाजिक आंदोलन केली. सामाजिक दृष्टीने कोविड मध्ये प्रत्येक गावाला आर्थिक मदत करत सहकार्याची भुमिका घेतल्याचे राजेंद्र दादा नागवडे यांनी सांगितले. दोन वर्षात शिक्षण संस्थेतून ५०० विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. पोलीस भरतीत ४२, आणि नेवित १९ विद्यार्थ्यांना संधी मिळाली. Naac च A+ नामांकन मिळाले.. बापूंच्या शिकवणी नुसार कामांबाबत शब्द पाळण्याचा प्रयत्न करीत आहोत.. असेही त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील काही भागातील पाणी प्रश्न आणि midc चा प्रश्न मार्गी लावण्याचा मानस आहे. त्यासाठी अजित दादा आपणं मदत करावी. राज्यातील ठोस कार्य करणारा नेता म्हणुन आपली ओळख आहे.. असे नागवडे यांनी सांगितले.. आम्हाला समाजकारण आणि राजकारणात अनेकदा मदत करण्याचा प्रयत्न पवारांनी केला आहे. मागील पाच वर्षापूर्वी तालुक्यातील जनतेच्या नाराजीला सामोरे गेलो मात्र आत्ता अनुराधा नागवडेनां उभा करणारच.. असा पक्का निर्धार केला आहे.. सामान्यांचे काम केले आहे. तालुक्याला दिशा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तुमचे आशीर्वाद पाठीशी राहिल्यास आम्ही तालुक्यातील लोकांचा विश्वास टिकविण्याचा प्रयत्न करणारं असल्याची ग्वाही राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.
उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, मी सत्येला हपापलेला कार्यकर्ता नाही. मात्र स्व. शिवाजी बापू आणि आम्हीं सभागृहात एकत्र होतो. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी याठिकाणी येणे क्रमप्राप्त आहे. राज्याचे नेतृत्व, सहकार, राजकीय आणि समाजकारणी या जिल्ह्याने आणि तालुक्याने दिले आहेत. श्रीगोंदा तालुक्याच्या विकासात शिवाजी बापूंचा मोठा वाटा होता. बापूंच्या पुतळ्याच्या माध्यमातुन पुढील पिढीला प्रेरणा मिळावी. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सहकार क्षेत्रात बापूंचे योगदान मोठे असुन, राज्यातील सहकार क्षेत्रात बापूंनी नावलौकिक मिळवला आहे.

पुढे ते म्हणाले की, शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. पाणी नियोजन करने महत्वाचे आहे. प्रत्येकाला दर्जेदार घर, शिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लोकांचे प्रश्न मिटले पाहिजेत. विकास कामं दर्जेदार होणे अपेक्षित आहे. नगर, काष्टी, दौंड रस्ता सिमेंटचा झालेत. नॅशनल हाइवे, रेल्वेचं जाळ, नवीन tecnology निर्माण केली. लोकांना सुविधा दील्या पाहिजेत. महिलांना अधिकची मदत करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. असेही सांगितले.
बापूंनी गावच्या सरपंच पदापासून सुरूवात केली.. विकास सोसायटी.. पंचायत समिती सदस्य.. आमदार असा प्रवास केला.. सामान्य कार्यकर्त्यांनी जमिनीवर कामं केल्यास लोकं पाठीशी राहतात. बापूंनी कारखाना उभा केला म्हणजे ते दर्दी होते. त्यांनी जीव ओतून कामं केलं. बापू पूर्वी कम्युनिस्ट पक्षात होते त्यानंतर त्यांनी आयुष्यभर काँग्रेस मध्ये राहुन जबाबदारी पार पाडली. मोठा राजकीय प्रवास केला. कारखान्यामुळे परिसरात आर्थिक सक्षमता आली. शिवाजी बापू नागवडे यांना यावेळी विनम्र अभिवादन करून, कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवर, कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थांचे आभार सुभाष शिंदे यांनी व्यक्त केले.
स्त्रोत:(आयोजीत कार्यक्रम)
