कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या आणि भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय व्हावा: निशांत लोखंडे.

दिनांक ११ मे,श्रीगोंदा:

सोशल मिडियावर सध्या कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने,महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत कृषी विद्यापीठे अनभिज्ञ आहेत. न्याय सर्वांना सारखा असावा , सेव्ह अॅग्रिकल्चर स्टुडंट्स फ्रॉम कोरोना, शेतकऱ्यांच्या पोरांना न्याय मिळालाच पाहिजे,अशा आशयाच्या पोस्ट फिरत आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या बाबतीत जसा निर्णय घेतला.तसा आमच्याही बाबतीत घ्यावा.अशी कृषी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे.या मागणीला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या श्रीगोंदा शहराध्यक्ष यांनी दुजोरा दिला आहे.तसेच, कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लोखंडे यांनी सूचित केले आहे की,”कृषी विद्यापीठांतील कुलगुरूंनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या हिताच्या आणि भविष्याच्या दृष्टीने जाहीर करायच्या असलेल्या सूचनांचे आणि निर्णयांचे ,परिणामांचे सादरीकरण कृषी खात्याला करायला हवे.

विद्यार्थ्यांची संख्या , ड्रॉप बसलेले विद्यार्थी आणि शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परिक्षा घ्यायचा निर्णय झाला, तर त्यासाठी करावी लागणारी तयारी,परत कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी पुढच्या वर्षीचे कॅलेंडर,असे प्रश्न आहेत.त्यावर मार्ग काढायची प्रक्रिया चालू असणारच,असा विश्वास दाखवत.हे आपलं सरकार आहे,इथं भेदभाव नक्कीच होणार नाही .थोडा वेळ लागेल.पण,विद्यार्थी हिताचाच निर्णय होईल.असे निशांत लोखंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading