मृतदेहाच्या अंगातील शर्टने केला खुनाचा उलगडा..शरीर सुखाची मागणी करीत असल्याने,महिलेने साथीदारांच्या मदतीने त्याचे मुंडके तोडून केलते धडा वेगळे..

दिनांक १३ फेब्रुवारी (टाकळी कडेवळीत,श्रीगोंदा):

श्रीगोंद्यात मागील तीन-चार दिवसांपासून शीर नसलेल्या मृतदेहाबाबत चर्चा चालू होती. आज त्या चर्चेला पूर्णविराम लागला असून, आरोपी श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी त्यांच्या स्थानिक प्रशासनामार्फत तपास पूर्ण केला आहे. आज या प्रकरणी पत्रकार परिषद घेत, त्यांनी या शिर नसलेल्या मृतदेहाच्या खुना बाबतची माहिती पत्रकारांसमोर मांडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील टाकळी कडेवळी गावचे शिवारात निर्जनस्थळी दिनांक ८ फेब्रुवारी रोजी शिर कापलेले पुरुषाचे प्रेत पुरलेल्या अवस्थेत मिळुन आल्याची खबर पोलीस पाटील शेडगाव यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिली होती. त्यावरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जावुन तपास सुरु केला. पुरलेले प्रेत उकरुन काढले असता पुरुषाचे शिर नसलेले कुजलेल्या प्रेताचे ससुन हॉस्पीटल पुणे येथे पोस्टमार्टम करण्यात आले. धारधार हत्याराने शिर कापले असल्याचे मत वैधकीय अधिकारी नमूद केले. या नंतर भा.द.वि.कलम ३०२, व २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करुन, गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी स्वताकडे घेतला. गुन्ह्याचे तपासकामी दोन पथके तयार केली. एकास घटनास्थळावरील डमडाटा काढुन त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्याचे काम व दुसरे पथकास जिल्ह्याबाहेरील व नगर जिल्ह्यातील पंधरा दिवसात दाखल झालेल्या तरुन पुरुषांच्या मिसिंग बाबतचा तपास करण्यास सांगितले. घटनास्थळाचा डमडाटा काढला असता काही मोबाईल नंबर मिळुन आले. त्या मोबाईल नंबरचे एसडीआर, सीडीआर, टॉवरलोकेशन काढुन त्याचे तांत्रिक विश्लेषन केल्यानंतर सदर मोबाईल वापरत असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला व त्यांना ताब्यात घेवुन कसुन चौकशी केली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सुरवातीला संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मिसिंग इसमांचा शोध घेत असताना, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे येथे २ फेब्रुवारी २१ रोजी रमेश सदाशिव जाधव रा.आंबेगाव, पुणे हे दिनांक ३१ जानेवारी पासुन मिसिंग असलेबाबतची नोंद होती. तपास करीत असताना खुन झालेल्या अज्ञात इसमाचे अंगावर मिळुन आलेल्या शर्टच्या कॉलवरील टेलर्सच्या नावामुळे मिसिंग दाखल असलेली व्यक्ती ही नमूद टेलरकडे कपडे शिवत असावे असा संशय आल्याने, पोलिसांनी त्या अनुशंगाने तपास केला असता, मिसिंग इसम रमेश जाधव सदर टेलरकडे नेहमी कपडे शिवत असल्याचे त्याचे घरच्यांनी सांगितले. मिसिंग जाधव याचे घरातील मुले व इतर नातेवाईक यांना पोलीस स्टेशनला बोलावुन प्रेताचे अंगावर मिळाले कपडे, बेल्ट इत्यादी वस्तु दाखविल्या असता, त्या रमेश जाधव यांच्याच असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले.

त्यावरुन टाकळी कडेवळीत शिवारात मिळालेले पुरुषाचे प्रेत हे रमेश सदाशिव जाधव रा.आंबेगाव पुणे याचे असल्याचे खात्री झाली. गुन्ह्याचे तपासामध्ये मोबाईल डमडाटाचे केलेले तांत्रिक विश्लेषण, खुन झालेल्या ईसमाचे पटलेली ओळख, त्याचे संपर्कातील व्यक्तींचा गुन्ह्याचे अनुशंगाने तुलनात्मक अभ्यास करुन पोलिसांनी संशयित आरोपींना बारामती, पाटण, सातारा, कोळसेवाडी, कल्याण येथुन ताब्यात घेतले. एक महिला, तेजस बाळासाहेब भोसले दोन्ही रा.माळेगाव ता.बारामती, राजेश विठ्ठल गायकवाड रा.माझगाव ता.जि.सातारा, अमोल गोविंद कांबळे, प्रशांत बजरंग साबळे दोघे रा.माळेगाव ता.बारामती या संशयित आरोपींकडे सतत चार दिवस कसून तपास केला असता, त्यांनी रमेश जाधव याचा खुन केल्याची कबुली दिली.

आरोपींनी रमेश सदाशिव जाधव रा.आंबेगाव, पुणे यास माळेगाव बारामती येथे जमिन दाखविण्याचे बहाण्याने दिनांक ३१ जानेवारी रोजी बोलावुन घेवुन त्याला सिध्दटेक मार्गे टाकळी कडेवळीत गावचे परिसरात रात्रीचे वेळी माळरानावर घेवुन आले. त्याला धारधार सत्तुराने मानेवर वार करुन, जिवानिशी ठार मारले व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचे शिर धडापासुन वेगळे करुन, त्याचे प्रेत निर्जणस्थळी खड्डा करुन पुरले. तर, शिर दुसरे ठिकाणी पुरले. दोन दिवसानंतर परत येवुन, शिर उकरुन दुसरे ठिकाणी नेवुन जाळुन नष्ट केले. यातील संशयित महिलेला मयत हा वारंवार फोन करुन व समक्ष भेटल्यावर शरीर सुखाची मागणी करत असल्याचे कारणावरून इतर आरोपीतांची मदत घेवुन, या महिलेने इतर चार आरोपींनी रमेश सदाशिव जाधव यांचा निघृणपणे खुन केला. तपासाअंती याबाबत पोलीस अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकारांना माहिती दिली.

सदर उत्कृष्ट कामगिरी (मा.पोलीस अधिक्षक) श्री.मनोज पाटील साहेब, (मा.अप्पर पोलीस अधिक्षक) श्री.सौरभकुमार अग्रवाल साहेब, (मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत), श्री.अण्णासाहेब जाधव साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक) श्री.रामराव ढिकले, (पोलिस निरीक्षक, स्थागुशा) अनिल कटके, (सपोनि) दिलीप तेजनकर, (सपोनि) विठ्ठल पाटील, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ दादा टाके, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ विनायक जाधव, पोकॉ संजय काळे, पोकॉ गोकुळ इंगवले, पोकॉ राजु भोर, पोकॉ किरण जाधव, मपोकॉ लता पुराणे तसेच सायबर सेलचे पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली आहे.

स्रोत:(श्रीगोंदा पोलीसांची प्रेसनोट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading