श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्येच लाच घेताना हा पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला.!

दिनांक  २७ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा.:

श्रीगोंदा पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशनच्या आवारातच ७,००० रुपयांची लाच स्वीकारताना हा कर्मचारी सापडल्याने कायद्याचे रक्षण करणाऱ्यांकडूनच भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा रंगली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एका मारामारीच्या गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानुसार, आज सायंकाळी नियोजित सापळा रचण्यात आला आणि लाच घेताना संबंधित पोलीस कर्मचारी रंगेहाथ पकडला गेला.

या घटनेमुळे श्रीगोंदा पोलीस दलात खळबळ उडाली असून, लाचलुचपत विभागाची अधिकृत कारवाई सुरू आहे. पुढील तपासानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती उघड होईल.

(स्रोत: मिळालेल्या माहितीनुसार)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading