दिलीप (नाना) सोनवणे यांच्या रूपाने हजारों हात माझ्या संघटनेला जोडले गेलेत.: राजेश जिंदाल..

दिनांक ३ मार्च २०२४, श्रीगोंदा:

अँटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया या संघटनेचा पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम काल श्रीगोंदा स्थित सार्वजानिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहावर आयोजीत करण्यात आला. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.राजेश जिंदाल हे स्वतः उपस्थित होते. NGO स्थापन केली त्यावेळी एकटा होतो.. मात्र, कामाची व्याप्ती वाढली आणि आज महाराष्ट्रात दिलीप (नाना) सोनवणे यांच्या सारखा सक्रिय पदाधिकारी भेटल्याने संघटनेला हजारों हात जोडले गेलेत.. असे मत श्री.जिंदाल यांनी याठिकाणी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, चांगल्या कामाला गती मिळतेच. सामान्य माणसाच्या समर्थनात आवाज उठवण्याचे मुख्य ध्येय डोळ्यासमोरं ठेऊन संघटना वाटचाल करीत आहे. नेहमी चांगल्या मार्गात अडचणी येतील त्याचा सामना करावा.. गरजवंताना न्याय देण्यासाठी ‘अँटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया’ कार्यरत आहे. मी चोवीस तास सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी उभा आहे. संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी कोणाशी वाद न घालता, पुराव्यानिशी कामं कराव, अस आवाहन श्री. जिंदाल यांनी यावेळी केले.

महाराष्ट्रात दिलीप (नाना) सोनवणे यांच्या सारखा लढवय्या कार्यकर्ता भेटल्याने संघटनेला मोठा फायदा होईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भ्रष्टाचार, महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, मुलांवरील संस्कार, शासनाच्या माध्यमांतून महिलांना स्व: संरक्षणासाठी तयार करुन, रोजगार निर्मिती करने. असे उद्देश संघटनेसमोरं असुन, नाना सोनवणे, आप्पा सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमांतून या सर्व मूळ मुद्यांना गती मिळेल. असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी ‘अँटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया’च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी श्री. मनीष खुराना यांची नियुक्ती करण्यात आली. बशीर शेख यांची जिल्हाध्यक्ष, अहमदनगर, संजय सांगळे सचिव, अहमदनगर, ॲड. रविंद्र शितोळे, कायदेशिर सल्लागार, सुरेखा बडेकर, हवेली तालुकाध्यक्ष, पोपट जायभाय, सक्रिय सदस्य,  जावेद सय्यद, राज्य सल्लागार, शिवाजी खोमणे, जिल्हा उपाध्यक्ष, महेश थिटे, सचिव तर, वैभव हराळ यांची राष्ट्रीय सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी दिलीप (नाना) सोनवणे (राष्ट्रीय उपाध्यक्ष, ‘अँटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया’), वस्ताद पै.शहाजी आप्पा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत, कांतिलाल कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत नवं नियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास पै. नितिन सोनवणे, बाळनाथ सोनवणे, रमण सोनवणे, लखन सुर्यवंशी, सनी सोनवणे, दत्तात्रय मोरे, दिपक सोनवणे, सुहास सोनवणे यांचे सह दिलीप नाना सोनवणे मित्र परिवार, वस्ताद शहाजी आप्पा सोनवणे मित्र परिवार आणि ‘अँटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय, राज्य, जिल्हासह तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कांतिलाल कोकाटे यांनी केले. तर, आभार शिवाजी खोमणे यांनी मानले. कार्यक्रमात युवा उद्योजक आणि नामांकित पैलवान नितिन सोनवणे यांचा जन्मदिवस केक कापून साजरा करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष जिंदाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष नाना सोनवणे, वस्ताद आप्पा सोनवणे यांनी नितिन सोनवणे यांना वाढदिवसाच्या सदिच्छा व्यक्त करीत कार्यक्रम संपन्न झाला.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Video: मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय अध्यक्ष जिंदाल.. आणि मंचकावर उपस्थित मान्यवर..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading