श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये आदिवासी महिलेचा गोंधळ;.. वरिष्ठ अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषा वापरून केला राग व्यक्त..!

दिनांक २८ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये एका आदिवासी महिलेने मोकाट गोंधळ घालत वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकेरी अर्वाच्य भाषा वापरल्याने उपस्थित प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी आणि नागरिक आश्चर्यचकित झाले.

माहितीनुसार, संबंधित महिला गंभीर आणि दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची विनंती करत होती. तथापि, तिचा आरोप आहे की, अधिकारी खोटे गुन्हे दाखल करतात आणि तडजोडीच्या स्वरूपात मदत करण्यास असमर्थ आहेत. “तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करणार नाही” असा शब्द ऐकल्यानंतर महिला चिडलेली दिसली. यानंतर तिने पोलीस स्टेशनच्या ठाणे अमलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या केबिन बाहेर जोरात गोंधळ घालून अधिकाऱ्याला एकेरी भाषेत राग व्यक्त केला.

तिने म्हटले, “माझ्याकडे बघा, मी कधीही यांच्याकडून मदत मिळवली आहे का?” असे म्हणून पोलीस निरीक्षकासोबतच इतर उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केले. यावेळी त्या अधिकाऱ्याने शांतपणे आपल्या केबिनचा दरवाजा बंद करून शांतपणा राखला.

ही सर्व घटना घडली तेव्हा श्रीगोंद्यात उपस्थित असलेले वरिष्ठ अधिकारी कर्जत उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे हे उपस्थित होते.

स्रोत: अधिकृत माहितीनूसार

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading