मोटरसायकलला बिबट्या आडवा आल्याने अपघात, बेलवंडी पोस्टेचे दोन पोलीस जखमी..

दिनांक २८ मार्च (बेलवंडी,श्रीगोंदा):

मोटारसायकलला बिबट्या अचानक आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना तालुक्यातील उक्कडगाव शिवारात रस्त्यावर शनिवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव शेलार व अजिनाथ खेडकर हे गव्हाणेवाडी चेक पोस्ट येथील दिवसपाळी ड्युटीवर होते. ते दोघे ड्युटी संपवून मोटारसायकलवरून माघारी येत असतांना उक्कडगाव शिवारात त्यांच्या मोटारसायकलला बिबट्या आडवा आला.येथे मोटारसायकलवरुन पडून ते जखमी झाले आहेत.

या अपघातात अजिनाथ खेडकर यांना पायाला व डोक्यास मार लागला असून,नामदेव शेलार यांना किरकोळ खरचटले आहे. बेलवंडी येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी माध्यमांना दिली आहे.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading