दिनांक २९ मार्च,अहमदनगर:
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे.या परिस्थितीत महाराष्ट्र पोलीस आणि डॉक्टर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत पणे कार्यरत आहेत.त्यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून, प्रहार संघटना संस्थापक, राज्यमंत्री,नामदार बचुभाऊ कडू यांच्या प्रेरणेने व प्रहार संघटना अहमदनगर जिल्हा यांच्या सहभागातून अत्यावश्यक सेवा म्हणून,अ.नगर पोलिसांना,तसेच डॉक्टर,नर्स आणि गोरगरीबांना मोफत आणि घरपोहच भाजीपाला देण्यात आला.
यावेळी (प्रहार वारकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष) अजय महाराज बारस्कर,(प्रहार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष) संतोषभाऊ पवार,(अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष)विनोदसिंग परदेशी,(उपाध्यक्ष) देविदास येवले,(कार्याध्यकक्ष)अजित धस,(जिल्हासचिव)प्रकाश बेरड,सागर जाधव, अजित गायकवाड, संतोष गायकवाड,विश्वास सुडगे,नितीन कांबळे,यावेळी उपस्थित होते.
(वार्तांकन व छायाचित्रे:नितीन रोही)
