दिनांक २८ मार्च,श्रीगोंदा:
कोरोनाचे सावट आता सर्वत्र दिसू लागले आहे. याच्या प्रादुर्भावातुन वाचण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य शासनाने देशातील व राज्यांमधील गर्दी कमी करत घरात राहण्याची सूचना दिली आहे.त्यानुसार सबंध देशातील जनजीवन घरामध्ये आहे.
या आपत्तीमध्ये शासनाने विविध उपाययोजना साधारण तथा गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आखल्या आहेत याची अंमलबजावणी होईलच.मात्र,चार दिवसांपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे उदरनिर्वाहाचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.या परिस्थितीत अन्नधान्याने संपन्न असलेल्या सक्षम लोकांचे कदाचित कमी हाल होतील. मात्र,ज्यांची हातावरची पोटे आहेत किंवा रोजंदारीवर ज्यांचे कुटुंब अवलंबून आहे,अशांना या अडचणीच्या दिवसांत अन्नधान्याची उणीव भासन्याची शक्यता स्पष्ट होत आहे.
उदभवलेल्या अडचणीच्या कालखंडामध्ये अनेक दानशूर लोक गरिबांसह साधारण लोकांच्या मदतीला पुढे येत आहेत. त्यापैकी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगरसेविका यांनी नमूद प्रभागामध्ये गरजूंना धान्य वाटप केले आहे. या आपत्तीमध्ये नगरसेविका सोनाली हृदय घोडके यांनी केलेल्या मदतीमुळे प्रभाग ७ मधील लोक नगरसेविका सोनाली घोडके यांचे आभार मानत आहेत.
