प्रिय बंधु भगिनी,लहान थोर, आणि असंवेदनशील,बोंबलत रस्त्यावर फिरणाऱ्यांनो! पत्र लिहिण्यास कारण की !

” स. न. वि. वि” .

प्रिय बंधु भगिनी,लहान,थोर आणि असंवेदनशील, बोंबलत रस्त्यावर फिरणाऱ्यांनो!! त्र लिहिण्यास कारण की !

मला माहित नाही.यापुढे पत्र लिहिण्यासाठीं मी जिवंत असेल किंवा नाही ,कालपर्यंत गावाला राहतोय वाचेल , पण आज वाटत नाही, गाव काय, आणि शहर काय ? शेवटी तुम्ही घेऊन आलाच ना अहमदनगर जिल्ह्यामध्ये ” कोरोना “! अरे सरकार बोंबलतय एवढं जरी आपण ऐकलं असतं ना , तरी आपण जिल्हयाच्या सीमेवरच थांबवलं असतं या भयानक रोगाला .

अरे पहिली स्टेज, दुसरी स्टेज,आरं कुठं जायचे अजून …?

पहाता , पहाता घरात घुसला हा ” कोरोना “हात धुवा , लोकांत मिसळू नका , स्वतःची काळजी घ्या , हा संदेश प्रधानमंत्री , मुख्यमंत्री यांनी दिला .नाही ऐकलं,लॉक डाऊन केलं , नाही ऐकलं , संचार बंदी केली , नाही ऐकलं ,आत्ता काय फायरींगचे आदेश काढल्यावर ऐकणार आहात का ? अरे हे कोणासाठी आहे ?

ते पोलीस बांधव , त्यांना पण बायका पोरं आहेत रे.

आपल्यासाठी २४ तास रस्त्यावर आहेत ते .आणि डॉक्टर ज्यांना माहित आहे ” कोरोना ” सारख्या भयानक रोगावर औषधच नाही. तेही जिवावर उदार होऊन २४ तास आपल्यासाठी कार्यरत आहेत . ते सफाई कामगार ज्यांना माहित आहे , घाणीचे साम्राज्य असेच वाढत राहिले तर ” कोरोना ” पेक्षा महाभयंकर रोग होईल . म्हणून ते कशाचीही फिकीर न करता साफसफाई मध्ये व्यस्त आहेत आणि नेहमीच ज्यांचा T. R. P. साठी काही पण बातम्या दाखवतात.असं आपण ज्यांना म्हणत होतो ना ? ते सर्व प्रकारचे मीडियावाले , कसलीही पर्वा न करता , आपल्या जीवाची तमा न बाळगता , गल्ली ते दिल्ली पर्यंतची कोरोना विषयीची सर्व माहिती देतात . कशासाठी रे ?

आणि ते सीमेवर लढणारे जवान … ज्यांना माहित नाही इकडून गोळी येईल की तिकडून बॉम येईल का? “कोरोना” सारख्या भयानक आजाराची बाधा होईल . तरीही ते देशाच्या सीमेवर आपला जीव मुठीत घेऊन लढत आहेत त्यांचे काय.? त्यांचे काय ..?

हिंदू , मुस्लिम , शीख , इसाई सर्वधर्मीय..

खरं तर जाती पातीचे खुळ डोक्यात मिरवणे , एवढा आत्ता वेळच कोणाकडे आहे ?पहाता , पहाता संबंध जगाला वेढलंय या ” कोरोना ” ने आणि हो तुम्ही या जगाचा विचारच करू नका.. संबंध भारताचा पण विचार करू नका ..अरे सर्वात जास्त रुग्ण आपल्या महाराष्ट्रात आहेत.म्हणजे,आपण किती संवेदनशील आहोत ? याची ला…..ज बाळगा .

खुशाल तुम्ही रस्त्यावर फिरता राव आणि खरं तर रस्त्यावर बोंबलत फिरणाऱ्यांनो ,मरायचे आहे तुम्हाला तर, खुशाल मरा …. प्रश्न तुमचा नाही , प्रश्न आहे तो तुमच्या घरातील लहान , लहान भावंडाचा , म्हाताऱ्या आई – बाबांचा , आज्जी – आजोबांचा.

अरे खुशाल रस्तावर बोंबलत फिरताय दिवाळी किंवा नातळाची सुट्टी नाही ही .जरा परदेशात काय चालले आहे ते पहा ! तिथं मेलेल्या माणसांची मयत उचलायला सुद्धा माणसं नाहीत. किड्या मुंग्या प्रमाणे मरून पडलेली माणसं..आणि तेच देश जगात मेडिकल क्षेत्रात वरच्या क्रमांक मध्ये आहेत,मग विचार करा…

तिच वेळ आपल्यावर आल्यावर काय होईल? प्रगत देशांची ही अवस्था आहे.मग,आपल्या महाराष्ट्रात १००० ते १५०० पेक्षा जास्त व्हेंटिलीटर नाहीत…विचार करा काय होईल आपलं ? घाबरू नका, काळजी घ्या , सरकारनं दिलेल्या नियमांचे पालन करा .पण घाबरू नका म्हटल्यावर निर्धास्त होऊ नका.आणि हो मला काहीच होणार नाही. हा ओव्हर कॉन्फिडन्स सोडून द्या ..जरा सिरीयस व थोरा मोठ्यांच्या सांगण्याचा फॉलो करा.

अरे मोठं,मोठी लोकं ज्यांचा एक तासाचा दर एक कोटी आहे ते घरामध्ये बसलेत आणि भिकार हो….. तुम्ही रस्त्यावर कशाला ? पोलिसांना त्रास देण्यासाठी ? का दूर असलेला “कोरोना ” व्हायरसला आपल्या घरात आणण्यासाठी ?

आणि हो रिकाम्या रस्त्यावर संचार बंदी असताना टिक टॉक बनवणासाठी मोकाट कुत्र्यांसारखे फिरणारांनो व ” कोरोना ” सारख्या महाभयानक रोगाची थट्टा करणाऱ्यांनो तुम्ही व्हिडीओ बनवा पण लोकांना सुरक्षेची माहिती देणारे , तुम्हाला ” कोरोना ” हा विनोद वाटतो का? विनोदी व्हिडीओ बनवू नका.लोकांना त्याचे गांभीर्य कळू द्या . प्रशासनाची टिंगल , बातमीदारांची टिंगल , पोलिसांची टिंगल अरे बस करा हे .तुमच्यामुळे हा रोग महारोग बनेल आणि या सर्व परिस्थितीला फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार असाल .पुन्हा सांगतो काळजी घ्या रे बाबांनो .सोशल मीडियाचा योग्य वापर करा , लोकांना घाबर नका .

अन हो मुंबई , पुणे वाल्यांना गावात येऊ नका!

आम्ही इकडे सुरक्षित आहोत.तुम्ही तिकडेच मरा आम्ही इकडे खुशाल आहोत. असे मेसेज टाकणाऱ्या माकडांनो तुमच्या बाचा गाव आहे का ? जे मुंबई,पुणे वाल्यां ना इकडे येऊ नका म्हणतात ना गावाकडच्या जत्रा , गणपती उत्सव साजरे करण्यासाठी लागणाऱ्या देणग्या दम देऊन घेतात , अन पुण्या मुम्बईमध्ये जर तुम्ही कामानिमित्त गेलात.तर,मग तुम्ही त्यांचेकडेच राहतात ,मग आत्ता का दुखतंय ? गावाकडे येतात तर त्यांना येऊ द्या , योग्य ती खबरदारी घ्या , चेकअप करा. समाज मंदिरे खाली करा , मंदिरामध्ये , शाळेमध्ये १०/ १२ दिवस राहण्याची सोय करा.गावावरती संकट आल्यावर ते धावून येतात.मग आता नको करायला त्यांच्यासाठी.

आता तुम्ही पुन्हा म्हणाल मंदिरात कशासाठी ?

मंदिरात देव आहे ! गप्प बसा…शहाण्या,जाणत्या लोकांनी निर्णय घेतलाय मंदिरे बंद केली दर्शनासाठी…का माहित आहे ? आता मंदिरात देवच नाही ! तो कधीच निघालाय अंशा-अंशाने विभागून कुठ डॉक्टर…,कुठं पोलीस..कुठं सफ़ाई कामगाराच्या रूपाने त्यामुळे तुम्ही देवाची काळजी करू नका.तुम्ही तुमची काळजी करा.!!

बस बाबा बस्स झालं आता, जास्त काही लिहीत नाही.प्रधानमंत्री,प्रशासन,मिडिया या सर्वांनी सांगून नाही ऐकलं तुम्ही आणि आता माझं काय ऐकणार ?

तरी देखील पुढचे १२ ते १३ दिवस स्वतःची काळजी घ्या.नाहीतर तुमच्या तेराव्याला बसायची वेळ येईल घरच्यांनवर पुन्हा प्रश्न पडतो तेरावा करायचा तरी कोणाचा ?

कारण तुमच्यामुळे सर्व गावच आज शांत ……..झा……….लं……….य……..…रे …….

आपलाच
राहुल साळवे..

असे कोरोना आजारासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे,मढेवडगाव तालुका श्रीगोंदा यांनी सर्वांनाच विचार करायला लावणारे हे पत्र लिहले आहे…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading