दिनांक २८ मार्च,येळपणे:
तालुक्यातील येळपणे येथे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गाव व परिसरातील वाड्या-वस्ती परिसरात जंतुनाशक औषध फवारणी केली जात आहे.
याबरोबरच विशेष स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत असून, गावात परगावाहून येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्याची विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच,औषध फवारणीसाठी ग्रामपंचायतिचे सदस्य अशोक पवार यांनी ट्रॅक्टर दिला आहे.
ग्रामपंचायतीकडून लोकप्रबोधनासाठी गेल्या दोन दिवसांपासून जाहीर सूचना देणेकामी ध्वनिक्षेपक लावून गाडी फिरवण्यात येत आहे. गावसुरक्षेसाठी सरपंच गणेश पवार,संजय पवार, अनिल पवार, संदीप पवार, अमोल खराडे, सतीश धावडे, (ग्रामविकास अधिकारी) गुरव,(ग्रामपंचायत कर्मचारी) सुनील कोळपे, निलेश हुलसर, गंगाराम कांबळे, मल्हारी खुडे, आदी परिश्रम घेत आहेत.
फोटो:-येळपणे येथे ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करताना.( छाया :-प्रमोद आहेर)
