दिनांक ३ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
इतर जिल्हा मार्ग १४१ क्रमांक या रोडवर घोड कॅनाल ठिकाणी नवीन पूल तातडीने मंजूर व्हावा यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते दिनांक ४ फेब्रुवारी २१ वार गुरुवार रोजी ११:०० वाजता मागण्या मान्य होत नाही व लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार आहेत.

सविस्तर माहिती अशी की,श्रीगोंदा टाकळी हा रोड गेले वीस वर्ष नादुरुस्त अवस्थेत होता. कालांतराने २०१० पासून येथील सुज्ञ नागरिकांनी या रोडसाठी व यावरील पुलासाठी वेळप्रसंगी पाण्यात बसून आमरण उपोषण करण्यापर्यंत आंदोलनं केली आहेत. त्यावेळेस भिंगान ग्रामस्त टाकळी ग्रामस्थ व स्थानकांसाठी पूल, रस्ते तातडीने मंजूर झालेले आहेत. हा पुल कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ श्रीगोंदा यांच्याकडे असल्याने, याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना उपोषण करण्याची वेळ आलेली आहे.यासंदर्भात श्रीगोंद्याचे नायब तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले असून,प्रसिद्धी पत्र माध्यमांना देण्यात आले आहे.
स्रोत:(नानासाहेब शिंदे, संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा)
