ग्रामस्थांकडून युवक काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळेंचे जंगी स्वागत..

दिनांक १ डिसेंबर(मढेवडगाव,श्रीगोंदा):

नुकतीच अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेले स्मितल वाबळे यांचे त्यांच्या मातृभूमीत मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथे ढोल-ताशांच्या गजरात फटाक्‍यांची आतषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले. मढेवडगाव सारख्या छोट्या गावात सर्वसामान्य कुटुंबातील एका साखर कारखाना कामगाराच्या मुलाला जिल्हा पातळीवरील पद मिळाल्याने मढेवडगावकरांचा आनंद ओसंडून वाहत होता.स्मितल वाबळे यांचा सत्कार समारंभ कौतुक सोहळा शनिवार दि.२९ रोजी संपन्न झाला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सत्काराला उत्तर देताना स्मितल वाबळे भारावून गेले. ते म्हणाले की, गेली सोळा वर्षे २००४ सालापासून काँग्रेस पक्षाचे काम सुरू केले. प्रथम विद्यार्थी काँग्रेस शाखेचा कार्याध्यक्ष कामाला सुरुवात केली. तालुका विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून व सत्यजित दादांनी मला जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून काम करायला संधी दिली.या संधीमूळे मी तालुक्यातील व जिल्ह्यातील युवकांच्या संपर्कात येऊन काँग्रेसची विचारधारा पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. व गावोगावी युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना युवकांच्या संघटित शक्तीतून न्याय देण्यासाठी आंदोलने केली. व गोरगरीब जनता व विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून, न्याय देण्याचा प्रयत्न केला.

याचीच पावती म्हणून, माझे दैवत प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात साहेब व युवकांचे आयकॉन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला जिल्हापातळीवर काम करण्याची संधी दिली. माझे नेते जो आदेश देतील तो आदेश पाळण्याचा आणि काँग्रेेस पक्षाचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे काम निष्ठेने व प्रामाणिक प्रयत्न करून, काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात सर्वात मोठे संघटन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सदस्य जिजाबापू शिंदे होते. प्रमुख उपस्थितीतांमध्ये (नागवडे कारखान्याचे संचालक) सुभाष शिंदे, (माजी संचालक) विक्रमसिंह वाबळे,प्रा. फुलसिंग मांडे, (काँग्रेसचे जिल्हा सहसचिव) ज्ञानदेव गवते, (सोसायटीचे चेअरमन) बापूसाहेब वाबळे, वसंतराव उंडे, बाळासाहेब मांडे, नंदिनी वाबळे, अविनाश वाबळे, हनुमंत झिटे, साहेबराव उंडे, (रयत क्रांती संघटनेचे) भाऊसाहेब मांडे, आदिल शेख, अमोल गाढवे, लक्ष्मण मांडे, गणेश मांडे, प्रा. योगेश मांडे, नवनाथ वाबळे, अभय गुंड, विशाल मांडे, अनिकेत मांडे, राहुल साळवे, भानुदास वाबळे, हनुमंत जाधव, दीपक वाबळे, भाऊसाहेब शिंदे, विलास बनकर, बापू शेलार, गावातील सर्व तरुण मंडळ व सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते व तरुण युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्रोत:(पत्रकार विजय उंडे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading