दिनांक १२ एप्रिल, श्रीगोंदा:
शहरातील एका व्यक्तीच्या घरात,संचारबंदी लागू असताना बेकायदेशीर मंडळी जमून अहमदनगर जिल्हाधिकारी यांचा आदेश मोडीत काढल्यामुळे येथील ५ जणांविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनिल गोपाळ शिंदे वय ३४ वर्षे , मंगेश अंबादास सूर्यवंशी वय ३३ वर्षे ,सागर रवीनाथ बोराडे वय २८ वर्षे ,विजय भगवान शिंदे वय २६ वर्षे ,गणेश अशोक गांजुरे वय २६ वर्षे सर्व राहणार श्रीगोंदा (श्रीगोंदा बस स्थानक परिसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. पोलीस कॉन्स्टेबल नामदेव सगर यांनी यांच्याविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे.
श्रीगोंदा तालुक्यासह शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचार बंदी तसेच जमाव बंदी लागू असताना,आज रविवारी दिनांक २२एप्रिल रोजी ३:१० च्या सुमारास ढोर गल्ली श्रीगोंदा या ठिकाणी विकास बोराडे यांचे राहते घरी विनाकारण एकत्र येऊन, जाणीवपूर्वक कोरोना विषाणूचा जीवितास धोका व जमावबंदी असतांना देखील अशाप्रकारे गर्दी झाल्यास संसर्ग पसरण्याचा संभव असल्याची माहिती असताना एकत्रित जमून गर्दी होण्यास कारणीभूत होऊन घातक व हयगयीचे कृत्य केले.
यानुसार नमूद आरोपींवर गु.र.नं व कलम आय ३४४/२०२० भा.दं.वि.कलम १८८,३६९,२७० व महा.पो.का १९५१ चे क ४४(१),१३९ साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल एस.आर.पितळे करत आहेत.
