लखपती होण्यासाठी व्हिजन.

दत्तात्रय कोठारे व त्यांच्या दोन बंधूंना बेलवंडी कोठार शिवारात वडिलोपार्जित सुमारे शंभर एकर शेती. शंकर, दत्तात्रय, शिवाजी तिघे बंधू दहावी नापास पण या निरक्षर कोठारी बंधूंनी शंभर एकर शेतीत ठिबक सिंचन व पिकांचे योग्य नियोजन केले असून दरवर्षी सुमारे एक कोटीचा नफा मिळवून कोठारे बंधू दरवर्षी शेतीतून लखपती होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.

शंकर कोठारे दत्तात्रय कोठारे व शिवाजी कोठारे या तिघा भावाच एकत्रीत कुटुंब मनीषा कोठारे ह्या पंचायत समिती सदस्या तर दत्तात्रय कोठारे हे बेलवंडी कोठार सोसायटीचे २० वर्षापासुन चेअरमन पद भुषवत आहेत. आशा कोठारे यांनी कुकडी साखर कारखान्याचे संचालक पद भुषविले आहे कुकडीचे पाणी येण्यापूर्वी पोटा पुरत धान्य शेतात निघत होते कुकडीचे पाणी आले आणि भाग्य उजळण्यास सुरूवात झाली.

दत्तात्रय कोठारे यांनी श्रीगोंद्यातील शेतीमित्राशी मैत्रीचा हात पुढे केला आणि शेतीचे चित्र बदलण्याची प्रकिया सुरू झाली सुरूवातीला उसाची शाश्वत शेती करण्याकडे भर दिला उस शेतीतून चांगले पैसे मिळाले पण भविष्यात पाणी टंचाईने डोके वर काढले.

कमी पाण्यात शेती करण्यासाठी सर्व शेतीवर ठिबक सिंचन आणि सुमारे चार एकराचे शेततळे केले कमी पाण्यावर येणाऱ्या डाळिंब शेतीकडे मोर्चा वळविला सुमारे दहा एकर डाळिंब, सुमारे चाळीस एकर उस आणी इतर क्षेत्रात भाजीपाला आणि धान्याची पिके घेण्याचे नियोजन केले. उसाचे एकरी उत्पादन ९० ते १०० मेटन काढण्यासाठी स्व : ताची पध्दत विकसीत केली आहे. त्यामुळे उस शेतीची गोडी वाढली. यासाठी तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे किरण मांगडे व शेतीतज्ञ नवनाथ रसाळ यांनी कोठारे बंधूंना वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि हे मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले आहे.

कोठारे बंधूंच्या शेतीतून परिसरातील दहा पंधरा मजुरांना शाश्वत रोजगार मिळाला आहे. कोठारे बंधूंचे वाटेकरी शिवाजी पुराणे दररोज स्व : ताच्या चार चाकी गाडीतून येतात शिवाजी पुराणे यांचे लाईफ बदलले आहे.

नियोजन महत्वाचे

सध्या भाजीपाला व इतर शेतीमालास बाजारभाव नाहीत अशा परिस्थितीत शेती टिकविणे मोठे आव्हान आहे. पण भाजीपाल्याचे क्षेत्र काही प्रमाणात कमी करून इतर पिकांचे नियोजन करणे महत्त्वाचे झाले आहे. दत्तात्रय कोठारे, बेलवंडी कोठारे

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

Leave a Reply