दलित महासंघाकडून हाथरस घटनेचा निषेध.

दिनांक ८ ऑक्टोबर,श्रीगोंदा:

हाथरस अत्याचार घटना जगभर निषेधास पात्र ठरत आहे. श्रीगोंदा तालुक्यातही या घटनेचा विविध संघटनांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला आहे. काल दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी श्रीगोंदा तालुका दलित महासंघाकडून या निंदनीय घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. याबाबतचे निवेदन स्थानिक प्रशासनास देण्यात आले.

हाथरस येथील अत्याचार आणि हत्याकांडाची जगभर निंदा केली जात आहे. या प्रकरणा संदर्भात सर्वत्र निषेधाचे निवेदन देत, आंदोलन केले जात आहेत. श्रीगोंद्यातही विविध पुरोगामी संघटनांकडून तसेच आंबेडकरी अनुयायांनी कडाडून निषेध नोंदविला आहे. दलित महासंघाने या घटनेचा श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना निवेदन देत, जाहीर निषेध केला आहे.

स्थानिक प्रशासनास दिलेल्या निवेदनावर, दलित महासंघाचे (तालुकाध्यक्ष) चंद्रकांत सकट, (तालुका उपाध्यक्ष) प्रमोद शेंडगे, (सामाजिक कार्यकर्ते) ज्ञानदेव शिरवाळे, (प्रसिद्धीप्रमुख) प्रकाश काळोखे, (सामाजिक कार्यकर्ते) दीपक गोरखे सह (जिल्हा उपाध्यक्ष) सलीम सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

स्त्रोत: (चंद्रकांत सकट यांनी प्रसिद्धीस दिलेले निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading