दिनांक २ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील ससाने नगर परिसरातील खून प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ४ फेब्रुवारी २०२५ रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज अविनाश भाऊ घोडके मित्रमंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला. या परिषदेत सामाजिक तेढ टाळत न्याय मिळवण्यासाठी अनेक ठोस मागण्या मांडण्यात आल्या.

खून प्रकरणाचा आढावा आणि मागण्या
दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी ससाने नगर परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला होता, ज्यात राम ससाने या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींना अद्याप संपूर्णपणे अटक करण्यात आलेले नाही. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपींवर खुनाच्या गुन्ह्यांतर्गत कारवाई व्हावी यासाठी अविनाश घोडके मित्रमंडळाने पुढील मागण्या केल्या:

- आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई: या खुनाच्या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींना तातडीने अटक करावी.
- पीडित कुटुंबाचे पुनर्वसन: समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून पीडित कुटुंबाला पुनर्वसनाची मदत मिळावी.
- दबावग्रस्त पीडितांना संरक्षण: पीडित कुटुंबावर दबाव असल्याने त्यांना प्रशासकीय संरक्षण मिळावे.
- शासकीय नोकरीची मागणी: मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी.
- फास्ट ट्रॅक सुनावणी: प्रकरणाची सुनावणी जलद गतीने करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी.
- सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई: सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना अविनाश घोडके, रोहन ससाने, प्रेम ससाने आणि इतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तर दिली. “या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असे घोडके यांनी स्पष्ट केले.

निलेश राणे यांचे स्वागत:
दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी निलेश राणे श्रीगोंदा दौऱ्यावर येत असून त्यांचे स्वागत आहे. शहरवासीयांनीही त्यांचे स्वागत करावे.. असे आवाहन घोडके यांनी केले.

उपस्थित मान्यवर
या पत्रकार परिषदेला प्रेम ससाने, प्रथमेश ससाने, ओम ससाने, संदीप ससाने, गौरव ससाने, ओमकार ससाने, यश ससाने आणि विविध सामाजिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(पत्रकार परिषद)
