कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी.
श्रीगोंदा-पारनेर उपविभागातील आठवडेबाजार व जत्रा बंद.
दिनांक २० अहमदनगर:-
श्रीगोंदा – पारनेर उपविभागातील श्रीगोंदा व पारनेर हद्दीतील गावांमध्ये मोठया प्रमाणात आठवडे बाजार, जत्रा, यात्रा भरत असतात. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने नागरिक, व्यापारी जमा होत असून कोरोना विषाणुचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडे बाजार, जत्रा, यात्रा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(4) मुबई पोलिस अधिनियम 1957 चे कलम 43(1) व मार्केट अँड फेअर ऍक्ट 1862 मधील कमल 3,4 व 5 अन्वये प्राप्त अधिकारानुसार श्रीगोंदा- पारनेर उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील आठवडेबाजार, जत्रा, यात्रा दिनांक 31 मार्च 2020 पर्यत बंद ठेवण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे.
(वृत्तसंस्था)
