काय चालले श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ..? निरीक्षक भोसले यांच्या सह स्थानिक पोलिसांवर एल्गार मेळाव्यात ना.भुजबळांनी व्यक्त केली नाराजी..!

दिनांक ३ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

आज नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी भटके विमुक्त महाएल्गार मेळाव्यासाठी आपल्या भाषणातून बोलतांना ना. छगन भुजबळ यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या वर आरोप केले.

त्यांनी यावेळी उपस्थीत लोकांसमोरं भाषणात सांगितले की, श्रीगोंदा पोलीस स्टेशमध्ये कोणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आहेत.? तेथे एल्गार सभेची तयारी करण्यासाठी लोकं गेले होते. तर, ते पूर्व तयारीचे कामं करु नये.. त्याठिकाणी पोलीस गाडी पाठवली. ओबीसी समाजावर दहशत निर्माण केली. त्यांना नोटिसा दिल्या. नोटीस देण्याच्या नावाखाली सह्या घेतल्या. काय चालले..? फडणवीस साहेब..! ह्या डिपार्टमेंटला सांगा.. डिपार्टमेंट मध्ये असा भेदभाव करता कामां नये..! जे काय नियमाने असेल ते सर्वांनी करा.. पण आम्हाला एक न्याय..

यांच्या तीन तीन वाजेपर्यंत सभा..! रात्री दोन वाजता जाहीर सभा..! काय कारवाई केली..? कुठल्या पोलीसांनी कारवाई केली.? नाहक… एखाद्या घरा मध्ये.. सभा मंडपामध्ये.. पाच.. पंचवीस लोकांना जमून जर, कोणी आपल्याला नगरला सभेला जायचय प्रचार करत असेल.. तर, तुम्ही गाडी पाठवणार..! अश्या शब्दात ना. छगन भुजबळ यांनी पोलीस निरीक्षक भोसले व स्थानिक पोलीस यंत्रणेचा समाचार घेतला व नाराजी व्यक्त केली.

स्रोत:(एल्गार मेळाव्यातील ना. छगन भुजबळ यांचे भाषण)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading